श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहुर विधानसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ उद्या दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी हुतात्मा शंकरशाहा गोंड राजे मैदान किनवट येथे भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधीर्यांनी केले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याच्या उद्देशाने प्रचाराला सुरुवात केली असुन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपुर्ण महाराष्ट्रात प्रचार सभाचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा शंकरशाहा गोंड राजे मैदान किनवट येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला किनवट माहुर मतदारसंघातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तथा पदाधिकार्यांनी केले आहे.