नवीन नांदेड l शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाचा नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख पदी नावामनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे स्वागत मित्र मंडळ व पदाधिकारी यांनी फटाक्यांचा आतिषबाजी मध्ये करुन अभिनंदन केले.
दक्षिण विधानसभा मतदार संघाचे जिल्हाप्रमुख आंनद पाटील बोढांरकर यांना दक्षिण विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्याने रिक्त पदावार विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे, सदरील नियुक्ती बदल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अभिष्टचिंतन केले असून, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिले आहे,तर शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून सदरील नियुक्ती कालावधी एक वर्ष आहे .
विनय पाटील गिरडे यांच्या नियुक्ती मुळे नांदेड दक्षिण कार्यक्षेत्र मध्ये पक्षाला बळकटी मिळणार असल्याचे बोलल्या जात असुन या निवडीबद्दल ओबीसी नांदेड जिल्हा प्रमुख अनिल धमणे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कदम,सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,ऊपशहरप्रमुख पप्पू गायकवाड, दयानंद वाघमारे,सतिश खैरे,राजु टमान्ना ,ज्ञानेश्वर ढाकणीकर,काळेश्वर बागल,कैलास बागल,काशिनाथ बागल,सचिन बागल,ऊतम गिरडे,माधवराव गिरडे,गोविंद गिरडे,ज्ञानेश्वर भांगे,रवि रायबोळे,रवि थोरात,प्रदीप लोणे,जगदीश भुरे,व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.