किनवट, परमेश्वर पेशवे l निवडणूक निरीक्षक (सामान्य) शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांनी 83- किनवट विधानसभा मतदार संघातील निवडूक विषयक कामकाजाचा आढावा घेवून काही मार्गदर्शक सूचना केल्या. श्री शैलेंद्र कुमार यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्र. 7499127265हा आहे. Observer code-G-35602 हा आहे. ते ८३ किनवट विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ते काम पाहत आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 83-किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी नियुक्त केलेल्या सर्व कक्षाचे प्रमुख तथा सर्व नोडल अधिकारी यांची त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात बैठक घेवुन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार यांची सुद्धा आदर्श आचारसंहितेबाबत बैठक घेवुन मार्गदर्शन केले.
सदर बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे), सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, किशोर यादव, डॉ.अजय कुरवाडे, नायब तहसिलदार मोहमद रफीक, राजकुमार राठोड, रामेश्वर मुंडे हे उपस्थित होते.