हदगाव l हदगाव विधानसभा मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे,आदर्श आचारसंहितेचे मतदारसंघात काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.
मा निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री शैलेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची बैठक नुकतिच संपन्न झाली या बैठकीत निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या उमेदवारांनी ही या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले त्यांचे निरसन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले.या बैठकीनंतर निवडणूक निरीक्षक श्री.शैलेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा याप्रसंगी निवडणूक निरीक्षकांनी घेतला.
या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा नांदे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर,सहायक महसुल अधिकारी लक्ष्मण यम्मेवार यांच्या सह सर्व नोडल आधिकारी उपस्थित होते असे मिडीया कक्षाचे ए.एम.तामसकर,अनिल दस्तूरकर यांनी कळवले आहे.