किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट, माहूर विधानसभेचे माजी आ. प्रदीप नाईक यांच्या विजयासाठी साडेतीन शक्तीपीठां पैकी एक पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूर येथील रेणुका मातेंना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा कार्यकर्ते ईश्वर जाधव यांनी कार्यकर्त्यांसह साकडे घातले असून माजी आ. प्रदीप नाईक यांचा विजय होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
किनवट विधानसभेची निवडणूक ही येत्या काही दिवसावर येऊन ठेपली असून या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आ. प्रदीप नाईक हे या निवडणूकीत विजयी होण्यासाठी ईस्लापूर येथील युवा कार्यकर्ते ईश्वर जाधव यांनी कार्यकर्त्यांसह दि.5 नोव्हेंबर रोजी रेणुका मातेचे दर्शन घेत त्यांच्या विजयासाठी रेणुका मातेंना साकडे घातले आहे.
त्यांच्या समवेत पत्रकार संघाचे अध्यक्ष मारोती शेळके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .किनवट माहूर विधानसभेत माजी आ. प्रदीप नाईक यांच्या सोबत सर्वच समाजांचे कार्यकर्ते व सामान्य जनता त्यांच्या सोबत असल्याने त्यांचा विजय निश्चित होणार असून रेणुका मातेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करत असल्याने प्रचारात आघाडी मिळवत माजी आमदार प्रदीप नाईक यांना निश्चित विजय करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ईस्लापूर येथील युवा कार्यकर्ते ईश्वर जाधव यांनी या प्रसंगी बोलताना म्हणाले.