हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगांव हिमायतनगर विधानसभा २०२४ च्या निवडणूक रिंगणात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर उतरले आहेत. आजपासून त्यांच्या प्रचारांला सुरुवात करण्यात आली असून, हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर, शिवपती महादेव, मानाच्या वडाच्या गणपतीचे दर्शन घेऊन बुधवारी सकाळी ७ वाजता प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. फटाक्याची अतिशबाजारी करत हिमायतनगर शहरातील प्रचार कार्यालयांच उदघाटन करून प्रचार दौऱ्याला धुमधडाक्यात सुरुवात आली आहे.
याप्रसंगी मंचावर उपस्थित श्यामराव देशमुख सरसमकर, कृष्णा पाटील आष्टीकर, गणेशराव शिंदे, विठ्ठल ठाकरे, परमेश्वर गोपतवाड आदींनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून निवडणूक काळात गाफील न राहता अंग झटकून स्वतः उमेदवार समजून काम करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना निवडणून आणण्यासाठी व जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याची शपथ घेतली. तसेच मतदानाच्या दिवशी मतपेट्या सीलबंद होईपर्यत डोळ्यात तेल घालून काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपल्यानंतर श्री परमेश्वर मंदिर समोरून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. हिमायतनगर शहरातील गणेशवाडी, बोरगडी येथील मारोतीरायाच दर्शन, बोरगडी तांडा नं. 1 व तांडा नं.२, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ, खैरगाव, खैरगाव तांडा, लाईन तांडा, रमनवाडी, गोधनतांडा, सिबदरा (ज.), वडगाव (ज.), वडगाव तांडा, चिंचोर्डी, महादापूर, जिरोना, दगडवाडी, गणेशवाडी तांडा, सवना (ज.), वाशी, एकघरी, पार्डी, बाऱ्हाळीतांडा आदी गावातील मतदार नागरिकांच्या भेटी घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागात आमदार जवळगावकर यांच्या प्रचार दौरा येताच ठिकठिकाणी ढोल तश्या व बेण्डबाजाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. प्रचार दौऱ्यात वाहनाचा ताफा, कार्यकर्त्यांची गर्दी पाहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. प्रचाराची गती शेवटपर्यंत टिकवून ठेवत वाढली पाहिजे असा चंग कार्यकर्त्यांनी बांधून प्रचारात उडी घेतली असल्याचे कार्यकर्त्यांच्या उत्साही चेहऱ्यावरून दिसून आले आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, शहराध्यक्ष संजय माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ, सुभाष दादा राठोड, रामराव सूर्यवंशी, विठ्ठलराव वानखेडे, सुभाष शिंदे, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड, काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोमावार, गोविंद बंडेवार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, फेरोजखान युसुफखान पठाण, डॉ प्रकाश वानखेडे, अनंतराव देवकते, सरदार खान पठाण, बाकी सेठ, कॉम्रेड दिगंबर काळे, योगेश चिलकावार, दीपक कात्रे, बाळू आणा चवरे, अमोल धुमाळे, प्रकाश रामदिनवार, संदीप तुपतेवार, पंडित ढोणे, मन्नान भाई, कानबा पोपलवार, सोपान बोंपिलवार, सचिन माने, काकडा दिंडीतील वारकरी भजनी मंडळी आदींसह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.