Dharmabad Police : धर्माबाद पोलीसांची कामगिरी; दोन आरोपीताकडुन मोबाईल चोरीतील २ लक्ष ७ हजाराचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड| धर्माबाद पोलीसांनी जबरी चोरीच्या दोन आरोपीताकडुन ७००० रुपये (सात हजार रुपये) तसेच गहाळ मधील २००००० (दोन लाख रुपये किमंतीचे १५ मोबाईल जप्त केले आहेत. पोलीस स्टेशन धर्माबाद येथील गुन्हे शोध पथकाची कामगिरी मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन प्लश आउट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते.

पोलीस स्टेशन धर्माबाद येथे काल दि.०६/०९/२०२४ रोजी गुन्हा नोंद क्रं २६१/२०२४ कलम ३०९ (४), ३ (५) भारतिय न्याय संहीता या गुन्हयात दोन अनोळखी ईसमाने फिर्यादीला धमकी देवुन बळजबरीने १०००० रुपये (दहा हजार रुपये) काढुन घेवुन फरार झाले होते. त्यानंतर सदर गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनि पवार यांनी तसेच धर्माबाद पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन, घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन, त्या आधारे सदर जबरी चोरीतील दोन आरोपीना २४ तासाचे आत धर्माबाद पोलीसांनी अटक करुन संबंधीत गुन्ह्यातील आरोपी नामे (१) शेख फेरोज अब्दुल करीम वय २६ वर्ष व्यवसाय मजुरी रा. समतानगर धर्माबाद (२) साईनाथ नंदु माने वय २९ वर्ष व्यवसाय मजुरी रा. देवीगल्ली धर्माबाद याचेकडुन गुन्हयात जबरीने काढुन घेतलेले रोख ७००० रुपये (सात हजार रुपये) जप्त केले आहेत.

तसेच पोलीस स्टेशन धर्माबाद येथे गहाळ दाखल झालेले एकुण १५ मोबाईल किमंती २००००० (दोन लाख रुपये) किमंतीचे मोबाईल सीईआयआर पोर्टलवरुन सदरचे कामकाज पाहणारे पो. काँ सतिश तलवारे यानी शोधुन काढुन ते हस्तगत केले आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री अबिनाशकुमार, पोलीस अधिक्षक सो नांदेड, मा.श्री. खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक सो भोकर, मा. श्री मळघणे सो. उप विभागीय पोलीस अधिकारी किनवट चार्ज धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.बाळासाहेब रोकडे, मपोउपनिप्रिंयका पवार, पोहेकाँ शंकरअप्पा घेवारे, पोहेकाँ महेश माकुरवार, पोहेकाँ संतोष संगेवार, पो. काँसचिन गडपवार, यानी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button