Dharmabad Police : धर्माबाद पोलीसांची कामगिरी; दोन आरोपीताकडुन मोबाईल चोरीतील २ लक्ष ७ हजाराचा मुद्देमाल जप्त -NNL
नांदेड| धर्माबाद पोलीसांनी जबरी चोरीच्या दोन आरोपीताकडुन ७००० रुपये (सात हजार रुपये) तसेच गहाळ मधील २००००० (दोन लाख रुपये किमंतीचे १५ मोबाईल जप्त केले आहेत. पोलीस स्टेशन धर्माबाद येथील गुन्हे शोध पथकाची कामगिरी मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन प्लश आउट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते.
पोलीस स्टेशन धर्माबाद येथे काल दि.०६/०९/२०२४ रोजी गुन्हा नोंद क्रं २६१/२०२४ कलम ३०९ (४), ३ (५) भारतिय न्याय संहीता या गुन्हयात दोन अनोळखी ईसमाने फिर्यादीला धमकी देवुन बळजबरीने १०००० रुपये (दहा हजार रुपये) काढुन घेवुन फरार झाले होते. त्यानंतर सदर गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनि पवार यांनी तसेच धर्माबाद पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन, घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन, त्या आधारे सदर जबरी चोरीतील दोन आरोपीना...
