CIDCO Hudco ; सिडको हडको बालाजी मंदिर,सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या कडून आढावा

नवीन नांदेड l भगवान बालाजी मंदिर सिडको व हडको सह परिसरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव दुर्गा मंडळ यांच्या दसरा ब्रम्होत्सव निमित्ताने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी प्रत्यक्ष भेटून गरबा दांडिया सह पोलीस बंदोबस्त आढाव घेतला यावेळी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको येथील भगवान बालाजी मंदिर येथे 35 ब्रम्होत्सव तर हडको येथील बालाजी मंदिर येथे 23 वा तर जुना कौठा येथे ब्रम्होत्सव आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने दरवर्षी आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने दैनंदिन पालखी मिरवणूक,कल्याण उत्सव यासह दसरा निमित्ताने भाविक भक्तांची होणारी गर्दी पाहता लागणारा पोलीस बंदोबस्त बाबत माहिती घेतली यावेळी सिडको पोलिस चौकीचे माने ,यादव,व वाचक शाखेचे बालाजी दंतापल्ले,बाला प्रसाद टरके यांच्या सह विश्वस्त समिती पदाधिकारी व पत्रकार रमेश ठाकूर, सारंग‌ नेरलकर यांच्यी उपस्थिती होती.

बालाजी मंदिर सिडको येथे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्ये स्वागत विश्वस्त समिती पदाधिकारी साहेबराव जाधव,डॉ.नरेश रायेवार, हाडोळे,बिराजदार यांनी तर हडको बालाजी मंदिर येथे विश्वस्त मंडळ पदाधिकारी संतोष वर्मा व किशोर देशमुख यांनी तर नवयुवक दुर्गा देवी महोत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button