नांदेड,अनिल मादसवार| शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविणे, कामाचा वेळ व कष्ट कमी करणे हे उद्दिष्ट ठेवून कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजना (Farmers should take advantage) राबविण्यात येत आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्राचा (human-powered tiller sowing machine) लाभ घ्यावा. हे पेरणी यंत्रावर अनुदान उपलब्ध असून शेतकऱ्यांनी या टोकण यंत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.


कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्र (Dibbler) गादी वाफयावर/ बेडवर पेरणी करता येत आहे. सरीमध्ये साचलेले पाणी पीकाला उपलब्ध होत आहे. दिर्घकाळ पावसाचा खंड पडल्यास पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. अतिरीक्त किंवा जास्तीचे साचलेले पाणी सरीमधून निघुन जाते. या मनुष्य चलीत पेरणी यंत्राचा वापर करुन एक मजुर एका दिवसात 3 ते 4 एकर सहजरीत्या गादी वाफयावर, बेडवर पेरणी करु शकतो.

अर्ज करण्याची पद्धत
शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर (सीएससी) सेतु सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्यांची प्रथम निवड होणार आहे. (FCFS) यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
यंत्राचे फायदे
पेरणीसाठी कमी मनुष्यबळाची आवश्यकता. वेळ आणि बियाण्यांची बचत. एकसंध पेरणीस मदत. उत्पादनक्षमता वाढविण्यात मदत. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेती सुलभ आणि उत्पादनक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
