मुंबई/नांदेड,अनिल मादसवार| महावितरणचे डायरेक्टर IAS लोकेश चंद्रा यांची मुंबईच्या अंधेरी येथील महावितरण मुख्य कार्यालयात आमदार बाबुराव कदम कोहळीकर (MLA Baburao Kadam Kohlikar) यांनी भेट घेऊन तातडीने नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघात येणाऱ्या मानवाडी फाटा (ता. हदगाव) व सोनारी फाटा (ता. हिमायतनगर) येथे 2 नवीन १३२ केव्ही विद्युत उपकेंद्र स्थापण (Approval should be given to establish a 132 KV independent power substation in Hadgaon/Himayatnagar taluka) करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.


नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघात येणाऱ्या मानवाडी फाटा (ता. हदगाव) व सोनारी फाटा (ता. हिमायतनगर) या भागातील लोकसंख्या, औद्योगिक वाढ आणि शेतीसाठी वीज वापर मोठ्या प्रमाणात दैनंदीन वाढत आहे. मात्र,अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे खूप मोठे नुकसान होत असून, नागरिकांना देखील याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.

परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन जनसामान्यांना रात्र अंधारात काढावी लागते आहे. तसेच शेतीसाठी वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी पिकासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. हि बाब लक्षात घेऊन या दोन्ही ठिकाणी १३२ केव्हीचे स्वतंत्र विद्युत उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार महोदयांनी केली आहे. त्यांनी केलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्येपासून मुक्ती मिळणार असल्याने जनसामन्यातून आमदार महोदयांचे आभार मानले जात आहेत.
