नांदेड| आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चे अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालया मार्फत सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमार्फत सहकार से समृध्दी तसेच सहकारातील विविध उपक्रमाची जनजागृती करण्याच्या हेतुने सहकार दिंडीचे (Sahakar Dindi through the District Sub-Registrar’s Office) आयोजन करण्यात आले होते.



या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उप जिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे, सहायक निबंधक प्रशासन योगेशकुमार बाकरे आदींची उपस्थिती होती. ही दिंडी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आली. या दिंडीत कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था व जिल्हृयातील सर्व गटसचिव, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.


सकाळी 10 वा. दिंडी सुरुवात झाली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमास उप जिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी मार्गदर्शन केले व सहकार विभागाच्या विविध उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
