नांदेडराजकीय

Reservation : हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर — महिलांचा दबदबा!

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण “सर्वसाधारण (ओपन)” वर्गासाठी जाहीर झाले असून, या घोषणेनंतर नगरपंचायतीच्या राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. आरक्षण जाहीर होताच शहरातील भावी नगराध्यक्ष पदाचे सुमारे १७ संभाव्य उमेदवार आपापल्या गोटात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. 

आरक्षण सोडतेचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर वं नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आगामी दिवाळीच्या नंतर निवडणुकीचा बिगुल वाजला असून,  आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, नगरपंचायतीच्या १७ वार्डांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे.

हिमायतनगर नगरपंचायत वार्डनिहाय आरक्षण
1️⃣ वार्ड क्र. 01 — खुला महिला (Open – महिला)
2️⃣ वार्ड क्र. 02 — खुला (Open)
3️⃣ वार्ड क्र. 03 — ओबीसी महिला (OBC – महिला)
4️⃣ वार्ड क्र. 04 — एसटी महिला (ST – महिला)
5️⃣ वार्ड क्र. 05 — खुला महिला (Open – महिला)
6️⃣ वार्ड क्र. 06 — ओबीसी महिला (OBC – महिला)
7️⃣ वार्ड क्र. 07 — एससी महिला (SC – महिला)
8️⃣ वार्ड क्र. 08 — खुला (Open)
9️⃣ वार्ड क्र. 09 — ओबीसी महिला (OBC – महिला)
🔟 वार्ड क्र. 10 — खुला (Open)
1️⃣1️⃣ वार्ड क्र. 11 — ओबीसी (OBC)
1️⃣2️⃣ वार्ड क्र. 12 — खुला (Open)
1️⃣3️⃣ वार्ड क्र. 13 — खुला (Open)
1️⃣4️⃣ वार्ड क्र. 14 — ओबीसी (OBC)
1️⃣5️⃣ वार्ड क्र. 15 — खुला महिला (Open – महिला)
1️⃣6️⃣ वार्ड क्र. 16 — खुला महिला (Open – महिला)
1️⃣7️⃣ वार्ड क्र. 17 — खुला (Open)
या आरक्षणात महिला उमेदवारांसाठी सर्वाधिक जागा आरक्षित झाल्याने यंदाच्या निवडणुकीत “हिमायतनगर नगरपंचायतीवर महिला राज येणार” अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे. इच्छुकांनी आपापल्या परीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापासूनच भावी नगरसेवक म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्षपद खुले वर्गासाठी जाहीर झाल्यामुळे अनेक अनुभवी तसेच नवोदित नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पुन्हा जाग्या झाल्या असून, निवडणुकीचा रंग अधिक गडद होत चालला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button