Sunday, June 28

Tag: Nagar Panchayat reservation announced

Reservation : हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर — महिलांचा दबदबा!

Reservation : हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर — महिलांचा दबदबा!

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण "सर्वसाधारण (ओपन)" वर्गासाठी जाहीर झाले असून, या घोषणेनंतर नगरपंचायतीच्या राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. आरक्षण जाहीर होताच शहरातील भावी नगराध्यक्ष पदाचे सुमारे १७ संभाव्य उमेदवार आपापल्या गोटात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.  आरक्षण सोडतेचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर वं नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आगामी दिवाळीच्या नंतर निवडणुकीचा बिगुल वाजला असून,  आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, नगरपंचायतीच्या १७ वार्डांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे. हिमायतनगर नगरपंचायत वार्डनिहाय आरक्षण 1️⃣ वार्ड क्र. 01 — खुला महिला (Open – महिला) 2️⃣ वार्ड क्र. 02 — खुला (Open) ...
error: Content is protected !!