उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे गोळेगाव ( तपोवन ) ता. लोहा येथे भृगू ऋषी यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला असून यानिमित्त शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवार 31 जानेवारी रोजी तर कलशारोहण सोहळा 3 फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे, तर सप्ताहाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.त्यात मुर्तीस रुद्राभिषेक व परम रहस्य ग्रंथाचे पारायण मन्मथ स्वामी गाथा भजन, सांयकाळी प्रवचन व रात्री शिवकिर्तन आदी धार्मिक कार्यक्रम दि. 27 जानेवारी पासून 3 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत.

गोळेगाव (ता. लोहा) गावाच्या उत्तरेस निसर्गरम्य ठिकाणी शिवाचे प्राचीन मंदिर आहे व परिसरात भृगू ऋषीची संजीवन समाधी मंदिर आहे. गावकऱ्यांच्या पुढाकारातून मागील गेल्या २3 वर्षांपासून यात्रा भरते. या यात्रेत सर्व जाती धमार्तील भक्त मंडळी हजेरी लावतात.

नवसाला पावणारा ऋषी अशी आख्यायिका सांगितली जाते. यात मूर्ती रुद्राभिषेक, महाआरती, उपहार, शिवपाठ, परमरहस्य ग्रंथाचे पारायण, मन्मत स्वामी गाथा भजन, प्रवचन व रात्री प्रख्यात कीर्तनकारांची कीर्तन होईल. त्यात शिवभक्त तानाजी पाटील थोटवाडीकर, स्वातीताई महादेव दमशेट्टे, चंद्रकांत गुरुजी अमलापुरे, शिवचरण गुरुजी रटकलकर , व्यंकटराव महाराज दगडवाडीकर, मनमत गुरुजी डांगे , संगमबस्व शिवाचार्य महाराज, तर काल्याचे किर्तन दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे होणार आहे. तर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या यात्रेस पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजेरी लावावी, असे आवाहन यात्रा कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
