हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून, लवकरच पवित्र रमजान महिणा देखील सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता ठेवावी आणि ठिकठिकाणी नादुरुस्त झालेले बोअर दुरुस्त करून पाणी टंचाई भासणार नाही याची काळजी घ्यावी.


महावितरण विभागाने शहरांमध्ये हिंदू – मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाच्या काळात लोड शेडिंग न घेता सुरळीत वीज पुरवठा द्यावा. पोलीस प्रशासनाने किमान श्री परमेश्वराची यात्रा आणि रमजान महिन्याच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे मुभा देऊन सर्व नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी हिमायतनगर शहराचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद व माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे नगरपंचायत, महावितरण, पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रति सबंधित विभागच्या वरिष्ठाकडे पाठविण्यात आले आहे.
