HomeनांदेडSolve the problems of city : महाशिवरात्री आणि रमजान महीण्याच्या काळात शहरवासीयांच्या...

Solve the problems of city : महाशिवरात्री आणि रमजान महीण्याच्या काळात शहरवासीयांच्या अडचणी सोडवा

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून, लवकरच पवित्र रमजान महिणा देखील सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता ठेवावी आणि ठिकठिकाणी नादुरुस्त झालेले बोअर दुरुस्त करून पाणी टंचाई भासणार नाही याची काळजी घ्यावी.

akhil Solve the problems of city : महाशिवरात्री आणि रमजान महीण्याच्या काळात शहरवासीयांच्या अडचणी सोडवा

महावितरण विभागाने शहरांमध्ये हिंदू – मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाच्या काळात लोड शेडिंग न घेता सुरळीत वीज पुरवठा द्यावा. पोलीस प्रशासनाने किमान श्री परमेश्वराची यात्रा आणि रमजान महिन्याच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे मुभा देऊन सर्व नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी हिमायतनगर शहराचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद व माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे नगरपंचायत, महावितरण, पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रति सबंधित विभागच्या वरिष्ठाकडे पाठविण्यात आले आहे.

akhil 1 Solve the problems of city : महाशिवरात्री आणि रमजान महीण्याच्या काळात शहरवासीयांच्या अडचणी सोडवा

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments