नांदेड| आवचित्त होते सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिन्यातल्या पहिल्या बैठकीचा रविवार! डाॅ.हंसराज वैद्य,अध्यक्ष फेस्काॅम उत्तर मराठवाडा विभाग,तथा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद नांदेड, “गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ व प्रबोधन” या फेस्काॅमच्या ध्येय धोरणांतर्गत ते बोलत होते.सभागृह “गरजवंत लाडक्या माय-बापांनी” खचाखच भरलेला होता!.
ते म्हणाले, माझ्या गरिब, गरजवंत “ज्येष्ठ लाडक्या माय बापांनो”,नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालूक्यात मदनूर नावाचे एक गाव आहे.हे खेडेगाव आंध्र, कर्नाटक, तेलंगाना या शेजारील राज्याच्या सिमेलगत आहे. तुलनात्मक रित्या अर्थिक दृष्ठ्या महाराष्ट्र राज्यापेक्षा समृद्ध नसलेल्या या राज्यांत ज्येष्ठ नागरिकांना 3000/- ते 4000/- रू प्रतिमहा सन्मान धन (मानधन) दिले जाते.सर्व मुलभूत सुख सुविधा प्रदान केल्या जातात. सन्मान दिला जातो. गोवा,दिल्ली,झारखंड, उत्तरांचल,उत्तर प्रदेश,हरियाना, पंजाब अदि राज्यात सुद्धा तिथे मुख्य मंत्री एक “नाथ” नस्तानाही मानधन दिले जाते. महाराष्ट्र राज्य तर अनाथाचा नाथ “एकनाथां”चा,देवादी देव “देवेंद्रांचा”,”अजितां”चा महाराष्ट्र असूनही इथे गरिब गरजवंत “लाडके ज्येष्ठ माय-बाप” च अनाथ का?.
कारण महाराष्ट्र राज्य तर संपूर्ण भारत देशाची अर्थिक राजधानी समजले जाते.समृद्ध राज्य समजले जाते. शाहू-फुले-आंबेडकर-येशवंतरावजी चव्हाणांचे पुरोगामी राज्य समजले जाते.इथे लोकप्रिय, लोकोपयोगी,योजनांचे धडाकेबाज नार्णय घेतले जाताहेत.इथे न मागताही अनेकांना अनेक योजनांतर्गत भरभरून मानधन दिले जाते. आपण तर गरिब गरजवंत “ज्येष्ठ लाडके माय-बाप”आहोत!इथे एक “नाथ” असूनही आपण अनाथ का? हा प्रश्न आपल्या प्रमाणे मलाही भेडसावतो आहे!
पण येत्या दहा आक्टोबरला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्रीजी, उपमुख्य मंत्रीजी द्वय नांदेड नगरीत लाडकी बहीन योजनांतर्गत महिला सक्षमीकरण आनंद सोहळ्या साठी येत आहेत. त्या निमित्त ते महाराष्ट्राचे नाथ असूनही इथे त्यांचे लाडके आई-वडिल (माय-बाप)अनाथ का? प्रश्न करावा असं वाटतं.माय-बापा विना लाडकी बहिण,लाडका भाऊ सह इतर सगळे लाडके आले कुठून?*आधी लाडके बूड(माय-बाप) व नंतर लाडक्या फांद्या,पाने, फुले, फळे ना?म्हणून आधी बूड सांभाळायला हवे! सद्याला माय-बापांनाच मान धनाची खरी गरज आहे.तेच अर्थात ज्येष्ठ माय-बापच गरजवंत आहेत.त्यांनाच मानधनाची अत्यंत गरज आहे. आणि या शासनाकडूनच आपणास न्याय मिळणार यात तिळयात्र शंका नाही म्हणताच सर्व उपस्थितांनी हात उंचाऊन त्यास दुजैरा दिला!.