Wednesday, May 13

Public awareness of electronic voting machine ; आगामी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचा अनुषंगाने बळीरामपुर येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती – NNL

नवीन नांदेड l नांदेड दक्षिण मतदारसंघातील बळीरामपुर येथे नांदेड तहसील कार्यालय कडून तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती अनुषंगाने मतदारांना व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या बाबतीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने दिनांक 29 सप्टेंबर रोजी मोजे बळीराम पुर येथे व्हीव्हीपॅट हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बाबत जनतेला माहिती देण्यात आली हे त्याची प्रात्यक्षिक घेण्यात आले.

यावेळी बळीरामपूरचे सरपंच प्रतिनिधी इंद्रजीत पांचाळ ,तलाठी डी.एस.सोनटक्के, मास्टर ट्रेनर तोटेवाड, कर्मचारी पवार हे उपस्थित होते.
यावेळी बळीरामपुर येथील महिला पुरुष, युवक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!