देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर शहापूर येथील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी कृषी कार्यालयात कागदपत्र देऊनही अनुदान मिळत नसल्याने शासनाचे आश्वासन हवेत विरले की काय..? असा प्रश्न आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गातुन व्यक्त केला जात आहे. तर कृषी विभागाने ज्या शेतकऱ्यांनी आधार कानेकट केलं नाही त्यानी बैंक खाते आधार शी जोडुन घ्यावं तरच अनुदान मिळेल असं सांगितले आहे.


शासनाने गेल्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपय देण्याचे आश्वासन दिले अन् दहा सप्टेंबर नंतर शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे शासनाचे अनुदान कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. चार दिवस उलटून देखील रक्कम जमा न झाल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दोन हजार शेतकऱ्यांपैकी चारशे शेतकऱ्यांचे आधार कार्ड नसल्याने अनूदान रोखले गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार कानेकट केलं नाही त्यानी बैंक खाते आधारशी जोडुन घ्यावं तरच अनुदान मिळेल असं सांगितले आहे.


भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्या पासून शेतकऱ्यांना पोकळ आश्वासने देऊन झुलत ठेवले जात आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाखाली सोयाबीन व कापूस विकावा लागला होता, त्या नुकसानीचा मोबदला म्हणून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये रोख अनुदान दोन हेक्टर पर्यंत देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र अद्याप देगलूर तालुक्यातील शहापूर येथील ना कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली ना शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले. अनुदान मिळणार असल्याने शहापूर येथील जवळपास दोन हजार शेतकऱी यांनी कृषी कार्यालयात आवश्यक कागद प्रस्ताव दिले होते.


त्या दोन हजार शेतकऱी पैकी चारशे शेतकऱ्यांचे आधार कार्ड नसल्याने अनूदान वाटप करण्यात आले नाही असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर आधार कनेक्ट नसल्याने चारशे शेतकऱ्यांना सोडून बाकीच्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप होईल सांगितले जाते आहे. १० सप्टेंबरपासून अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी विभागाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. परंतु १० सप्टेंबरचा मुहूर्त टळला तरीदेखील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

यंदा शेतकरी खरीपाच्या पिकाची लागवड केल्यापासून खत, बियाणे, किटक नाशक, निंदन, फवारणी कोळपणी करुन हाय ते घरातील रक्कम व किडूक मिडूक विकुन खरीपाच्या पिकाची लागवड केली. आता शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला असल्यानेच शेतकरी शासनाचं अनुदान केव्हा मिळेल. या आशेत जीवन जगत असून, शासनाने यांची दखल घेऊन लवकरात लवकर अनूदान वाटप करावे अशी मागणी केली जात आहे.


