Homeनांदेडकंधार लोहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडा बालाजी पाडागळे यांची पक्षश्रेष्ठी कडे मागणी...

कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडा बालाजी पाडागळे यांची पक्षश्रेष्ठी कडे मागणी – NNL

उस्माननगर, माणिक भिसे| आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जागावाटपा दरम्यान लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षास द्यावी अशी मागणी मा. आ . अमित विलासराव देशमुख ( मा. मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ) यांच्या कडे निवेदनाद्वारे पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

कंधार – लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातुर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील जनता ही काॅग्रेस पक्षाच्या विचारसरणीला मानणारी आहे. स्वातंत्र्य काळापासून इंदिरा गांधी यांना मानणारा मतदार या भागात पहावयास मिळेल. शिराढोण, उस्माननगर हे सर्कल वीस पंचवीस वर्षांपूर्वी मुदखेड विधानसभा मतदारसंघात समाविष्ट होता. त्यावेळी या भागाचे नेते लि.माधवरावची पांडागळे साहेब यांनी रान पेटवून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे. आज हा मतदारसंघ लातुर लोकसभा मतदारसंघातील कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात आहे.

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे मा.आ. ईश्वारराव भोसीकर साहेबांनी काॅग्रेस पक्षाकडून प्रतिनिधीत्व केले आहे. स्व. माधवरावाजी पांडागळे साहेब यांनी कंधार लोहा तालुके एकत्र असताना सलग दहा वर्षे सभापती पद भुषविले आहे. त्याच काळात गावा गावात ,वाडी तांड्यावर काॅग्रेस पक्षाची विचारधारा रुजलेली आहे. स्व. माधवरावजी पांडागळे साहेब यांनी १९९४-९५ या काळात विधानसभा निवडणुक लढविली होती. लोह कंधार विधानसभा मतदारसंघात एकुण ९ जि.प. सर्कल , पैकी ४ते ५ जिल्हा परिषद सर्कलवर नेहमी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम आसते. कंधार पंचायत समितीवर नेहमी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असते. तसेच लोहा पंचायत समिती मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर असतो.

कंधार व लोहा नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असते. कंधार तालुक्यात एकुण ११६ ग्रामपंचायत पैकी ७२ ग्रामपंचायत वर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. तसेच लोहा तालुक्यातील ११९ ग्रामपंचायत पैकी ७० ग्रामपंचायत वर काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व कायम आसते. तसेच विधानसभा मतदारसंघातील ६० टक्के सेवा सहकारी सोसायटीवर काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी कांग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करून काँग्रेस पक्षाच्या बाजूने भक्कम उभे असल्याचे दाखवून दिले आहे. स्व. माधवराव पांडागळे साहेब यांना मानणारा मतदार भरपूर आहे.

त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माजी सभापती तथा काँग्रेस पक्षाचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे हे काँग्रेस पक्षाचे कार्य जोमाने करतात. सर्वसामान्य जनतेच्या सुखा दुखात धावून येणारे कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षात पहावयास मिळतात. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व बाबींचा सहानुभूती पूर्वक विचार करून महाविकास आघाडीच्या जागावाटपा दरम्यान कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ सोडवून घेऊन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांला उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी मागणी कंधार पंचायत समिती चे माजी सभापती तथा काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे यांनी पक्षश्रेष्ठींकडे निवेदन मा.आ. अमित विलासराव देशमुख ( मा.मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई) यांच्या कडे मागणी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments