नांदेड| गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब हे शिखांच्या पाच पीठां पैकी एक पवित्र पीठ आहे. या पीठाचे दर्शना करण्यासाठी लाखो शिख भाविक येथे येत असतात कारण या स्थळावर श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांनी देहधारी गुरुवांची प्रथेला विराम देऊन शब्द गुरु श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांना गुरुता गद्दी प्रदान केली होती म्हणूनच या स्थानाला अनन्य साधारण महत्व शिख जगतामध्ये आहे तसेच या पीठाला शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.


या पवित्र स्थानी दररोज हजारोंच्या संख्येने श्रध्दालु येत असतात त्यांच्या निवासाची व्यवस्था गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे विविध यात्री निवासांमध्ये केली जाते. परंतु काही दिवसांपासून तख्त साहिब व आजू-बाजूच्या परिसराची विद्युत जोडणी वारंवार खंडीत होत आहे ज्यामुळे आलेल्या यात्रेकरूंना खुप त्रास सहन करावा लागत आहे त्याच बरोबर या यात्री निवासाची विद्युत सेवा पुर्ववत करण्यासाठी जनरेटर चा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे बोर्डावर सुध्दा डिजल व इत्यादी खर्चाचा अतिरिक्त ओझे वाढत आहे.

या बाबींना अनुसरुन गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांना ही गोष्ट निदर्शनास आणली व या विद्युत संकटावर काही तोडगा काढण्यासाठी उपाय योजना करा सांगितले। यावेळी महावितरणाच्या वतीने कनिष्ठ अभियंता – श्री जे. जे. चौधरी व वरिष्ठ अभियंता – श्री विनय घनबहादुर यांच्याशी चर्चा केली। यावेळी महावितरणाच्या वतीने स्पष्ट केले गेल की विविध विकास कामे चालू असल्यामुळे भुमीगत विद्युत केबल खंडीत झालेले आहेत ते भुमीगत असल्या कारणाने त्यांच्या दुरुस्तीचे काम करणे फार कठीण झाले आहे यांच मुळे गुरुद्वारा साहिब व आजू-बाजूच्या परिसराचा विद्युत पुरठा वारंवार खंडीत होत आहे.

अभियंत्यांकडून असेही सांगण्यात आले की गुरुद्वारा साहिब व आजू-बाजूच्या परिसराला तीसरी लाईन जी 220 के. व्ही. वाघाळा सब स्टेशन शी सुध्दा जोडली जाईल. व 33 के. व्ही. उपकेद्राहुन विद्युत पुरवठा करणाऱ्या भूमिगत केबल वायरला सुध्दा लवकरात लवकर बदली करण्याची व्यवस्था सुध्दा केली जाईल. जेणे करुन या परिसरात उद्भवलेला विद्युत पुरवठा बाबतचे संकट संपेल.

यावेळे गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ, स. जसवंत सिंघ बॉबी (दिल्ली), स. अमरप्रीत सिंघ, स. गुरबचन सिंघ शिलेदार अधिक्षक, स. जसप्रीत सिंघ बंगई अभियंता गुरुद्वारा बोर्ड, महावितरणाचे श्री जे. जे. चौधरी व श्री विनय बहादुर चर्चेवेळी उपस्थित होते.