Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Why is crime increasing in Marathwada? । मराठवाड्यात का वाढतेय गुन्हेगारी ? -NNL
क्राईम नांदेड July 21, 2024

Why is crime increasing in Marathwada? । मराठवाड्यात का वाढतेय गुन्हेगारी ? -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मराठवाड्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. गोळीबार, खून ,दरोडे, चोऱ्या हे प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे प्रकार व गुन्हेगारी थांबणार नसली तरी या प्रकरणात होणारी वाढ चिंतेची बाब ठरत आहे . पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही.

मराठवाड्यातील नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्या. नांदेडमधील बिलाल नगर परिसरात दारू पिण्याच्या किरकोळ वादातून एकाचा खून करण्यात आला. त्यानंतर रहिमपूर या भागात अनैतिक संबंधातून एकाची तर बळीरामपूर येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे केवळ ४८ तासात एकाच पोलीस स्थानक हद्दीत लागोपाठ तीन खून झाल्याने नांदेड शहरात कमालीची दहशत पसरली आहे.

हिंगोली जिल्ह्यात असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यात असोला या गावात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने गोळीबार केला. फिर्यादी नागोराव पावडे यांनी औंढा नागनाथ युवासेना तालुका युवा अधिकारी बालाजी नागरे यास मागील सहा दिवसांपासून शिवीगाळ का करत आहेस? अशी विचारणा केली त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला . यावेळी मारुती पावडे हे मध्ये पडलेले असताना त्यांच्यावर बालाजी नागरे याने गोळीबार केला. यामध्ये मारुती यांच्या पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी नागोराव पावडे यांनी गंभीर जखमी झालेल्या मारुती यांना उचलून नेण्याचा प्रयत्न केला असता विशाल नागरे यांनी त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांनाही जखमी केले. यापूर्वीही मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तसेच नांदेड जिल्ह्यातही नेहमीच गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत . बंदुकी व गोळीबार या नित्याच्याच बाबी झालेल्या आहेत. परभणीत १९ वर्षीय युवकाचा खून झाल्याने चांगलीच खळबळ उडाली.

रात्रीच्या वेळी १९ वर्षीय युवकास घरातून बाहेर बोलावून घेत त्यास मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोशनीनगर भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेत खून झालेल्या युवकाचे नाव शाहरूख हुसेन पठाण (१९. रा. रोशनीनगर, परभणी) असे आहे. तर शेख गौस, शैजादीबी शेख, मुन्नू शेख, वहिदाबी शेख (सर्वजण रा. रोशनीनगर, परभणी) अशी आरोपींची नावे आहेत.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात भेंडेवाडी येथे घराबाहेर अंगणात झोपलेल्या एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला चोरट्यांनी चाकूने जबर मारहाण करत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत पळवली . लक्ष्मीबाई मुंजाजी असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. असे प्रकारही मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात वाढले आहेत . नागरिकांना घराबाहेर पडल्यावर सही सलामात घरी येऊ की नाही याची देखील शाश्वती नाही. ग्रामीण भागात अंगणात व आखाड्यात ग्रामस्थांना झोपावे लागते . परंतु त्या ठिकाणी देखील ते सुरक्षित नसल्याचे अलीकडच्या घटनांवरून दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यातही असेच काहीसे चित्र आहे . संपूर्ण बीड जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. दररोज चोरीच्या घटना होत असल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. चोरटे सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम, मोटारसायकल, मोबाईल चोरी करत आहेत .‌परंतु आता चोरट्यांनी जनावरे चोरण्याचे सत्र सुरू केले आहे. बीडमध्ये मोकाट जनावरांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ग्रामीण भागात गोठ्यात बांधलेली जनावरे सर्रासपणे चोरीला जाऊ लागली आहेत. चराटा येथील चार बैल आणि दोन गाई चोरट्यांनी चोरून नेल्या . या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचे बिथरले आहेत.

बीड शहरातील बार्शी रोडवरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी दगडाच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले . या प्रकरणात पेंडगाव येथील अक्षय दिलीप गायकवाड या चोरट्यास पकडण्यात पोलिसांना यश आले. धाराशिव जिल्ह्यात तर आठवडी बाजारात दुचाकी नेणे ही अवघड होऊन बसले आहे. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे सोनार गल्लीत भरलेल्या आठवडी बाजारातून सतीश गायकवाड यांची एम . एच. २५ ए. ए. ८११४ ही हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल दिवसाढवळ्या चोरट्यांनी लांबवली. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या चोरीपासून गोळीबार, खून असे प्रकार संपूर्ण मराठवाड्यात वाढले आहेत. म्हणजेच छोट्या चोऱ्या व खून या मोठ्या घटनाही नित्याच्याच होऊन बसल्या आहेत. संपूर्ण मराठवाड्यातच गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याने एक मोठी चिंता नागरिकांना सतावत आहे.

मराठवाड्यात कायदा व सुव्यवस्था सुधारा अन्यथा हाहाकार माचेल असेच म्हणण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात अलिकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे पोलीसांचा वचक शिल्लक आहे की नाही, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. अलिकडे वाढलेल्या गुन्हेगारी घटनामुळे सर्वत्र दहशत व भिती पसरली आहे. पोलीसवाले आहेत, आपल्याला कांहीही फिकर नाही, असे आपण पूर्वी बोलत व एैकत असू. परंतु, आता समाजात तसे दिवस राहिलेले नाहीत. गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. चोर्‍या, दरोडे, धमकावणे, मारामारी करणे हे तर नित्याचेच व रोजचेच होवून बसले आहे. परंतु यापेक्षा भयानक म्हणजे खुलेआम-दिवसाढवळ्या खुनाचे प्रकार घडत आहेत. एकमेकांचा जीव घेणे खूपच सोपे होवून बसले आहे. अगदी क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून एकमेकांचे जीव घेतले जात आहेत. जीव खूपच सोपा व स्वस्त होवून बसला आहे. एक काळ असा होता की, पोलीसस्थानकाचे प्रमुखच लोकांना, समाजाला धाकामध्ये ठेवत असत, परंतु आता तर मोठमोठ्या अधिकार्‍यांनाही समाजाला धाकामध्ये ठेवण्याची शक्ती शिल्लक राहिलेली नाही. काही घटनांमध्ये गुन्हा घडल्यानंतर लगेच आरोपी सापडत आहेत.

अनेकदा पोलिस अधीक्षकांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी म्हणावा तेवढा धाक ठेवत नाहीत की काय? अशी शंका घेण्यास वाव आहे. एलसीबी, डीबी, गुप्तचर यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. आजच्या घडीला सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेली स्त्री, घरातून ज्या दागिन्यावर गेली तशीच घरी परतणार की नाही? याची भीती असते. सध्या गळ्यातील मंगळसुत्र, सोन्याची चैन हिसकावून पळणारेही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी करत आहेत. फक्त टीमलिडर खमक्या असून चालत नाही, त्यांचे सोबती व इतर अधिकारी व कर्मचारीही तेवढेच तत्पर असणे गरजेचे आहे.

सध्या नांदेड शहर एज्युकेशनल हब बनले आहे. राजस्थानमधील कोटा शहराची जी अवस्था आहे, अगदी तशीच किंवा त्यापेक्षा थोडी कमी अवस्था नांदेड शहराची बनली आहे. कोचिंग क्लासेसच्या निमित्ताने राज्यातून अनेक आई-वडील आपल्या मुला-मुलींचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी दोन-तीन वर्षांसाठी नांदेडला स्थायिक होत आहेत. यासाठी नांदेडला घर किंवा फ्लॅट भाड्याने घेवून ते डॉक्टर-इंजिनिअर घडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत त्या कुटुंबीयांना किंवा त्यांच्या पाल्यांना टारगट मुलांकडून किंवा एखाद्या गल्ली बोळ्यातील ‘दादांकडून’ घाबरून रहावे लागत आहे. दररोज हाणामारीच्या घटना घडत आहेत. यावर अंकुश ठेवण्याचे काम कोणाचे आहे? कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करायला नक्कीच वाव आहे. पोलिसांनी कठोरपणे स्वतःचे कर्तव्य पार पाडावे. त्यांना देखील त्यांच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळणे तेवढेच गरजेचे आहे. लोकसंख्या वाढलेली आहे. त्या प्रमाणात पोलीस स्थानकात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवणे गरजेचे आहे.प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय आहे.

स्वतःचे कुटुंबीय प्रिय आहेत, परंतु हे सर्व विचारात घेतांना पोलिसांनी जी नौकरी स्वीकारली आहे. अगोदर त्याचा विचार करणेही तेवढेच गरजेचे आहे. पोलीस खात्यात नौकरी स्वीकारत असतांना जी शपथ घ्यावी लागते. त्याचा विचार पोलिसांनी करावा. आज बिनदिक्कतपणे दुचाकीवर ट्रीपल सिट फिरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुठे आहे पोलिसांचा धाक अन् कुठे आहे वाहतूक शाखा. मराठवाड्याचा इतिहास पहा, पूर्वी काम करणारे अधिकारी व ठाणेप्रमुख पहा, ते कसे काम करायचे. किमान त्यांच्यासारखे काम करता येत नसेल तर कमीत कमी समाजावर तसेच गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक असणे गरजेचे आहे.

पोलिसांनी त्यांच्या धाकावरच समाजावर नियंत्रण ठेवावे, हे खूप गरजेचे आहे. आज नागरिकांना सुखाची झोप लागत नाही, कधी कुठे काय होईल. याचा नेम नाही. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील. यावर लक्ष केंद्रीत करावे, आज समस्त मराठवाडावासीय पोलिसांच्या विश्वासावर आहेत. पॅरोलवर सुटलेले, हिस्ट्रीशिटर गुन्हेगार, पूर्वीच्या अनेक गुन्ह्यात हवे असलेले आरोपी यांना पकडणे व त्यांच्या टोळ्या शोधून काढणेही तेवढेच गरजेचे आहे. शहरात दररोज दिवसा ढवळ्या होणारे गुन्हे कांही आपोआप होत नाहीत. त्यांना चालविणारे म्होरके शोधा, सापडल्यावर त्यांना खरा पोलीसी हिसका दाखवा, म्हणजे मराठवाड्यातील नागरिक सुखाचा श्वास घेतील, हे मात्र नक्की.

लेखक,,,,,डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com

in Marathwada? Why is crime increasing
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSchool meet । भर पावसात सात किलोमीटर पायी चालत तिन्ही जिल्हा परिषद च्या शिक्षण अधिकाऱ्यांनी मांजरी माता व वाघदरी गावांतील शाळेंना दिल्या भेटी -NNL
Next Article State Route No. Fixing the limit of 259 s. C. Construct a drain । राज्य मार्ग क्र. २५९ ची हद्द कायम करूण सि. सी. नालीचे बांधकाम करावे ; सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

पोखरभोसी येथे अखंड दत्तनाम सप्ताहास प्रारंभ -NNL

December 21, 2022

crop insurance ; पिक विमा मिळाला नसल्यास प्रपत्रात माहिती सादर करण्याचे आवाहन – NNL

August 22, 2024

संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २३ व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील नव्वद यात्रेकरूंचा सत्कार -NNL

July 6, 2024

Woman Doctor : भाजीविक्रेत्याची मुलगी ठरली बरडशेवाळा येथील पहिली महिला डॉक्टर

October 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Aanganwadi worker commits suicide : सासरच्या जाचाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या; पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल

SAVWIPL planted : एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने महाराष्ट्रात ७० हजार पेक्षा जास्त झाडे लावली -NNL

Chikhlikar ; लोहा शहरातील घरकुल लाभार्थ्यांन आ चिखलीकरांचा दिलासा ! ;९ कोटी ९० लक्ष रूपयांचे अनुदान प्राप्त

Acne secondary mineral theft from the roots of tambi : गौण खनिज चोरांकडून रात्री आणि सुट्टीच्या दिवशी पोखरला जातो टेंभीचा माळ -NNL

Acb action ; पंचासमक्ष 21हजार 500 रुपयांची लाच स्वीकारनाऱ्या सिडको महानगरपालिका येथील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?