लोहा | पोलीस दलातर्फे जिल्ह्यात दोनशे गणेश मंडळ डीजे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे लोहा कंधार तालुक्यात गणेश विसर्जन कारताना पर्यावरण पूरक आणि डिजेमुक्त मिरवणूकिला सर्व गणेश मंडळाने प्राधान्य देऊन हा विसर्जन सोहळा शांततेत पार पाडावा. असे अहवान कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी केले आहे.


गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमंडळाचे अध्यक्ष, गावातील पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक याची कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अश्विनी जगताप याच्या उपस्थितीत लोहा पोलीस ठाण्यात पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व पोलीस अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. डी. वाय. एस. पी. डॉ. अश्विनी जगताप यांनी गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करावा असे सांगून लोहा कंधार तालुक्यातील गणेश मंडळांनी आपण पर्यावरण पूरक आणि डीजे मुक्त मिरवणूक काढावी सामाजिक धार्मिक उपक्रम देखावे करावेत.


शहरी ग्रामीण भागात पारंपरिक वाद्य यावर गणेश विसर्जन मिरवणूक काढाव्यातकोणताही अनुसूचित प्रकार घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. गणेश मंडळ अध्यक्ष त्या त्या गावातील पोलीस पाटील यांनी सतत पोलिसांच्या संपर्कात राहून संपर्क साधावा गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे. असे आवाहन पोलीस उपविभागीय डॉक्टर अश्विनी जगताप यांनी केले आहे. पोलीस बंदोबसाठी अधिकची पोलीस यंत्रणा लोहा ठाण्यात कार्यरत आहे. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शना खाली शहरांमध्ये पोलीसानी पथ संचलन केले.


सुनेगाव तलावात गणेश विसर्जन
दरवर्षी प्रमाणे यंदाही लोहा शहरातील गणेश विसर्जन सुनेगाव तलावात करण्यात येणार आहे. तेथे नगर पालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असून, तलाव अधिक भरला आहे. तेव्हा गणेश विसर्जन काळात एकदाच गर्दी करून नये तसेच जीवरक्षक ठेवण्यात येणार आहे. शांततेत गणेश विसर्जन करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी केले आहे.


