Friday, May 15

Tag: in Marathwada?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

नांदेड, लेख
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मराठवाड्याला चांगलाच पावला आहे. मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे मार्गांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर- बीड- परळी तसेच जालना- जळगाव व नांदेड - वर्धा रेल्वे मार्गांचा समावेश आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी हे तीन रेल्वेमार्ग पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हे रेल्वे प्रकल्प प्रलंबित असल्याने त्यावरील कामाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता. परंतु केंद्रीय अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याने आता मराठवाड्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. अहमदनगर- बीड - परळी या रेल्वेमार्गासाठी ४ हजार ९५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जालना- जळगाव रेल्वे मार्गासाठी ५८०४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मराठवाडा व विदर्भाला जोडणारा नांदेड- वर्धा हा रेल्वे मार्ग ...
मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

नांदेड, महाराष्ट्र, लेख
मराठवाड्यातील नांदेड ,लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यात मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील 130 मंडळात येणार्‍या जवळपास 2550 गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला. वार्षिक सरासरी 679 मि.मी.च्या तुलनेत विभागात 573 मि. मी. म्हणजेच 84% पाऊस झाल्याची नोंद आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांची पूर्ण नासाडी झाली. एवढेच नव्हे तर शहरी भागात असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त नागरिक ,शेतकरी व व्यापारी राज्य शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यात प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत. पालकमंत्र्यांकडूनही पूरग्रस्त भागाची पाहणी झालेली आहे. शासनाने लवकरात लवकर अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसाचा कहर कायम असून नांदेड जिल्ह्यात गुरुवारी ए...
In Marathwada, Sharad Pawar and Ubhat have lost : मराठवाड्यात शरद पवार व उबाठांना सोडचिठ्ठी – NNL

In Marathwada, Sharad Pawar and Ubhat have lost : मराठवाड्यात शरद पवार व उबाठांना सोडचिठ्ठी – NNL

नांदेड, लेख
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर इकडून तिकडे उड्या मारणार्‍या नेत्यांपाठोपाठ कार्यकर्तेही पक्ष बदलत आहेत. मराठवाड्यात हल्ली हा प्रकार जवळपास सर्वच जिल्ह्यात सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी महायुतीला पसंती दर्शविली आहे. तशीच परिस्थिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची दिसून येत आहे. काहींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ केले तर काहींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याला पसंती दिली. पक्ष बदली करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शरद पवार, उबाठा तसेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठवाड्यातील आजी-माजी नेते तसेच पदाधिकारी व कार्यकर्तेही सत्ताधारी पक्षाकडे वळत आहेत.मराठवाड्यात अनेक आजी-माजी पदाधिकारी महायुतीत...
A test of loyalty in Marathwada : मराठवाड्यात निष्ठेची परीक्षा -NNL

A test of loyalty in Marathwada : मराठवाड्यात निष्ठेची परीक्षा -NNL

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लेख
मराठवाड्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खूप वेगळी आहे . लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यावर लढविली जाते. तसे पाहिले तर मराठवाड्यासाठी महायुतीने भरभरून योजना दिल्या. त्या योजनांची उतराई करण्यासाठी मराठवाड्यातील मतदार महायुतीच्या बाजूने उभा राहतो की पुन्हा लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीच्या पारड्यात मते जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये राज्यात लढत होत आहे . प्रत्यक्षात मात्र मराठवाड्यात सहा पक्षाचे वेगवेगळे उमेदवार, बंडखोर तसेच इतर अपक्ष व अन्य छोट्या-मोठ्या पक्षांच्या उमेदवारांच्या लढती लक्षवेधक आहेत . लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला म्हणावी तशी साथ मतदारांकडून मिळाली नाही. त्यावेळची परिस्थिती व सध्याच्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे विधानसभेत मराठवाडा कोणाच्या बाजूने उभे ...
Why is crime increasing in Marathwada? ।  मराठवाड्यात का वाढतेय गुन्हेगारी ? -NNL

Why is crime increasing in Marathwada? । मराठवाड्यात का वाढतेय गुन्हेगारी ? -NNL

क्राईम, नांदेड
मराठवाड्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. गोळीबार, खून ,दरोडे, चोऱ्या हे प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे प्रकार व गुन्हेगारी थांबणार नसली तरी या प्रकरणात होणारी वाढ चिंतेची बाब ठरत आहे . पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. मराठवाड्यातील नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्या. नांदेडमधील बिलाल नगर परिसरात दारू पिण्याच्या किरकोळ वादातून एकाचा खून करण्यात आला. त्यानंतर रहिमपूर या भागात अनैतिक संबंधातून एकाची तर बळीरामपूर येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे केवळ ४८ तासात एकाच पोलीस स्थानक हद्दीत लागोपाठ तीन खून झाल्याने नांदेड शहरात कमालीची दहशत पसरली आहे. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यात असोला या गावात...
error: Content is protected !!