भावी आमदार म्हणून जनता डॉ. रेखाताई चव्हाण त्यांच्याकडे पाहते आहे याचे हे उदाहरण एका जागरूक मतदाराने पाठविले असून जश्याला तसे वाचक व सुज्ञ मतदारांना माहितीस्तव पाठवीत आहोत.


कोण आहेत डॉ. रेखाताई चव्हाण ?
जन्म सामान्य घरातील वडील तसे सरळ आणि शिस्तबद्ध.. कुटुंब मध्यमवर्गीय परिस्थितीचे.. जेमतेम आर्थिक परिस्थिती.. घरात दोन भाऊ दोन बहिणी…. सुरुवती पासूनच वाचनाची आवड होती.. ताईंवर वडिलांचा प्रभाव त्यांच्यासारखं ताई सुद्धा सरळ, प्रेमळ पण तेवढ्याच स्पष्ट स्वभावाच्या..


मध्यमवर्गीय कटुंब असूनही वडिलांच्या आर्थिक नियोजनामुळे शिक्षण व्यवस्थित झाले व त्या डॉक्टर झाल्या.पुढे जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाचा संबंध आला. रेखाताई जिजाऊ ब्रिगेडशी जोडल्या गेल्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार केला. समाजात वावरत असताना त्यांनी अनेकजणांना मदत केली. वाचन वाढतं राहील व संपर्कही वाढतं गेला. ही सामान्य घरातील मुलगी जिजाऊ ब्रिगेडची महाराष्ट्र राज्याची अध्यक्ष झाली.. पुढे समाजातील बऱ्याच मुलींना व इतर लोकांना त्यांनी या ब्रिगेडच्या मदतीने खूप मदतही केली. व्याख्यान आयोजित केली त्यातून जागरूकता वाढवली.

त्यांचे कर्तृत्व व समाजाबद्दल असलेली तळमळ मा. अशोकराव चव्हाण यांना लक्षात आली. त्यानी डॉ.रेखा ताईंना राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. पण ते काही त्यांच्या मनाला सुरुवातीला पटले नाही.. पण कालांतराने राजकारण व समाजकारण यांची त्यांनी सांगड घातली. रेखाताई महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या राज्य महीला उपाध्यक्ष झाल्या व राजकारणात राहूनही त्यांनी समाजकारण केले. आता त्यांना अचानक पक्षादेश आला की, विधानसभेसाठी एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही मतदासंघांत तयारी करा..पण निवडणुकीला वेळ फक्त दोन ते अडीच महिने होता.. पण मागे हटतील त्या ताई कसल्या ते त्यांच्या स्वभावात नव्हते ही सर्व आव्हाने त्यांनी स्वीकारली व कामाला लागल्या ..

आज 2 महिने झालेत साधारण मतदासंघांतील 230 पैकी त्यानी 195 गावांना भेटी दिल्या..त्यातच दिल्ली ,नागपूर ,मुंबईच्या मीटिंग केल्या..पण त्या मागे हटल्या नाही.. रोज सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्या काम करतात आणि आज त्यांचे नाव मतदार संघात सगळीकडे परिचित आहे.. एवढ्या प्रचंड आव्हानांना साधारण व्यक्ती पेलू शकत नाही. हे सत्यच त्यासाठी प्रचंड जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी पाहिजे जी रेखा ताईंनी ठेवली.. नक्कीच मी हे सर्व जवळुन पाहिले आहे.. त्यांच्या सारखा उमदा , सुशिक्षित, दूरदृष्टी व चिकाटी असलेला उमेदवार जर हदगाव हिमायतनगर मतदार संघाला मिळाला तर येत्या काळात ह्या दोन्ही तालुक्याचे रूप बदलणार ह्यात काहीच शंका नाही.. हे सर्व मी एक जागरूक मतदार म्हणून सांगत आहे पटले त्याने घ्यावे नाहीतर रामराम.. तसेच राहावे आपलाच..SSK