लोहा| लोहा शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना दिवाळी पाडवा निमित्ताने माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या भेटीगाठी घेतल्या त्यांचा .व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत सत्कार केला. गेल्या वीस वर्षा पासून सतेत असो की नसो अखंडपणे दिवाळी पाडवा निमित्ताने शुभेच्छा देत असतात.
लोहा शहरातील व्यापारी हातगाडेवाले-छोटे दुकानदार यांच्या भेटीगाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवाळी पाडवा निमित्ताने प्रतापराव आले होते यंदाही त्यांनी दीपावली पाडवा निमिताने शहरात व्यापाऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या,संवाद साधला विधानसभा निवडणूकीच्या काळ त्यामूळे दिवाळी निमित्ताने लोहा शहरात व्यापाऱ्याच्या भेटीगाठी घेतल्या. यापूर्वी कधीच ते मार्केट मध्ये दिसले नाहीत याची संपूर्ण शहरात खमंग चर्चा सुरु झाली. तर दुसरीकडे गेल्या वीस वर्षापासून पण दुसरीकडे सतेत असो अथवा नसो दरवर्षी दिवाळी पाडवा निमिताने प्रतापराव पाटील चिखलीकर हे लोढ्यातील व्यापायऱ्यांना शुभेच्छा देत असताना यंदाही शनिवारी दिवाळी पाडवा याच मुहूर्तावर शहरात दुकानदारांना छोटे व्यापारी हातगाडेवाले फळविक्रेत यांना त्यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.
जागोजागी फटाक्यांची अतिषबाजी करत व्यापाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले सत्कार केला त्यांना शुभेच्छा दिल्या. आडत दुकान , कापड दुकान हॉटेल, फळ विक्रेते कृषी दुकान, मशनिरी, मेडिकल, किराणा अशा सर्व दुकानांचा याचा समावेश होता त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, माणिकराव मुकदम किरण वट्टमवार, रामराव सुर्यवंशी , सचिन पाटील, चिखलीकर, केशवराव सुकद्म, छत्रपती धुतमल, करिम शेख, दता वाले मारोती पाटील , खुशाल पाटील, बालाजी पाटील बोरगावकर हरिभाऊ चव्हाण, बी. डी. जाधव नरेंद्र गायकवाड भास्कर पाटील बालाजी खिल्लारे, अनिल ध्रुतमल, सतीश निखाते दीपक कानवटे, दीयक सूर्यवंशी, सचिन मुकदम, बाळू पवार, सूर्यकांत पार्डीकर, निखिल महाबळे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
खंबीर नेता प्रतापराव।..असेच आमदार हवा
प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे लोहा शहरावर प्रेम आहे आणि येथील जनतेनी त्यांना नेहमीच साथ दिली आहे सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे नेते अशी जनसामान्यांच्या हृदयात प्रतापरावांच्या प्रति आदराचे स्थान आहे. असा धाडसी नेताच आमदार असला पाहिजे. त्याची या मतदार संघाला गरज आहे तेच निवडून येणार. व्यापारी व सर्व जनतेच्या भल्यासाठी काळाची गरज आहे असा स्पष्ट भावना मतदार व्यक्त करत आहेत.