HomeनांदेडDeputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर...

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड| महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक यांचेही आगमन झाले.

WhatsApp Image 2025 03 23 at 11.00.11 AM Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजू नवघरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार.

WhatsApp Image 2025 03 23 at 11.00.11 AM 3 Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. बी.एच. तळवी, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आणि विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments