श्रीक्षेत्र माहूरगड, राज ठाकूर| नवत्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहूरगडावर भेट देऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले. तसेच सपत्नीक श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड हवन विधी केला.


गुरुवार दि,१० रोजी रात्री ११ वा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सपत्नीक यांच्या हस्ते श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड येथे होमहवन विधी संपन्न झाला. होम विधीचे पौरोहीत्य वेदपाठ शाळेचे गुरुजी वे.शा.सं. निलेश केदार, दुर्गादास भोपी, शुभम भोपी, अरविंद देव, यांचा संच व वेद शाळेचे शिष्यांनी वेदाचे आठ अध्याय झाल्यानंतर अभिजीत राऊत यांच्या हस्ते श्री रेणुकादेवीची विधीवत पुजा करुन महाआरती करण्यात आली. नंतर तेरा अध्याय पुर्ण झाल्यानंतर होम कुंडासमोर महाआरती करण्यात आली.
