HomeBlogBaburao Kendre ; किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख पदी बाबुराव केंद्रे यांची नियुक्ती...

Baburao Kendre ; किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख पदी बाबुराव केंद्रे यांची नियुक्ती – NNL

किनवट /परमेश्वर पेशवे | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीची आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांची किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणुन नियुक्ती केली असून दि 7 ऑगष्ट रोजी लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात बाबुराव केंद्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

आगामी विधानससभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने किनवट मतदार संघात जोरदार तयारी सुरू केली असून त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठिने ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांची किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख म्हूणन नियुक्ती केली आहे. आ. भीमराव केराम यांच्या शिफरसीवरून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संघटनात्मक नियुक्तीची घोषणा केली असून दि 7 ऑगस्ट रोजी किनवट येथील पक्षाच्या लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या हस्ते व आ भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबुराव केंद्रे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

विद्यार्थी दशेपासून बाबुराव केंद्रे हे पक्षात एकनिष्ठपणे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आले आहेत यापूर्वी त्यांनी किनवट तालुका अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली असून सद्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. पक्षनिष्ठा, दांडगा जनसंपर्क,उत्तम वक्तृत्वशैली तसेच संघटनात्मक कार्याच्या बळावर बाबुराव केंद्रे यांनी पक्षात अढळ स्थान निर्माण केले.आमदार भीमराव केराम यांचे ते अत्यंत विश्वास व खंदेसमर्थक म्हणून ओळखले जातात.मागील निवडणुकीत बाबुराव केंद्रे यांच्या नियोजनबद्ध प्रचार व रणनीतीचा पक्षाला मोठा फायदा झाला असल्याने पक्षश्रेष्टीने त्यांच्यावर निवडणूक प्रमुखची जबाबदारी दिल्याचे समजते.

भारतीय जनता पक्ष हा विशाल महासागर आहे. निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येकाला पक्षाच्या उच्च पदावर काम करण्याची संधी मिळते. निस्वार्थ भावनेने मी गोरगरिब जनतेसाठी संघर्ष करत आलो. प्रत्येक वेळी पक्षाने माझ्या कार्याची दखल घेतली.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे,  श्रीकांत भारतीय, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच किनवट विधानसभेचे कार्यतत्पर आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकून दाखवणार अशा प्रतिक्रिया बाबुराव केंद्रे यांनी नियुक्तीनंतर दिल्या आहेत. या नियुक्तीबद्दल भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून बाबुराव केंद्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments