Baburao Kendre ; किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख पदी बाबुराव केंद्रे यांची नियुक्ती – NNL
किनवट /परमेश्वर पेशवे | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीची आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांची किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणुन नियुक्ती केली असून दि 7 ऑगष्ट रोजी लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात बाबुराव केंद्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
आगामी विधानससभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने किनवट मतदार संघात जोरदार तयारी सुरू केली असून त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठिने ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांची किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख म्हूणन नियुक्ती केली आहे. आ. भीमराव केराम यांच्या शिफरसीवरून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संघटनात्मक नियुक्तीची घोषणा केली असून दि 7 ऑगस्ट रोजी किनवट येथील पक्षाच्या लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या हस्ते व आ भीम...
