HomeकरियरChief ministers my school : ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत...

Chief ministers my school : ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत लोहा तालुक्यात तालुकास्तरीय तपासणी सुरू

लोहा/नांदेड| ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत लोहा तालुक्यातील शासकीय व खाजगी अशा एकूण २६ शाळांची तालुकास्तरीय तपासणी व मूल्यांकन प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. ही तपासणी गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णीगटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या स्वतंत्र पथकांमार्फत केली जात आहे.

लोहा तालुक्यातील १३ केंद्रांमधून केंद्रस्तरावर पात्र ठरलेल्या शाळांची तालुका पातळीवर तपासणी केली जात असून, यामध्ये जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या १३ व खाजगी व्यवस्थापनाच्या १३ अशा एकूण २६ शाळा ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ स्पर्धेत सहभागी आहेत.

मंगळवारी (दि. २० जानेवारी) लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयशिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या दोन खाजगी शाळांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी तपासणी करण्यात आली. ही तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

या मूल्यांकन समितीत साईबाबा हायस्कूल, मारताळा येथील ज्येष्ठ मुख्याध्यापक एकनाथ मोरे, केंद्रप्रमुख संभाजी भूरे (केंद्र मारताळा), जि.प. शाळा, जोशी सांगवी येथील मुख्याध्यापक प्रमोद गायकवाड, तालुका बीईओ कार्यालयाचे संगणक प्रमुख सर्वजित धुतराज यांचा समावेश होता.

मूल्यांकन समितीने शाळेची स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, विद्यार्थ्यांचा सहभाग, शालेय परिसर, शिस्त व सुविधा आदी बाबींची अतिशय बारकाईने व मुद्देनिहाय तपासणी केली.

या वेळी कै. विश्वनाथराव नळगे हायस्कूलचे मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी मूल्यांकन प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले. “या तपासणीमुळे अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या असून शाळेत नवोपक्रम राबविण्यास अधिक प्रेरणा मिळेल,” असे त्यांनी सांगितले.

तपासणीदरम्यान ज्येष्ठ मुख्याध्यापक एकनाथ मोरे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे यांनी शाळा प्रशासनाला मौल्यवान अभिप्राय नोंदविला.

‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या उपक्रमामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून, शैक्षणिक गुणवत्ता व शालेय वातावरण अधिक सुदृढ करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरत असल्याचे चित्र लोहा तालुक्यात दिसून येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments