Homeक्राईमThift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल...

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड |  नांदेड ग्रामीण पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर वेळेत कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेऊन मोठा गुन्हा उधळून लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्हा क्रमांक 114/2026 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 310(4) तसेच आर्म्स ॲक्ट 1959 चे कलम 3 व 25 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 09 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 01.25 वाजता, गुप्त माहितीच्या आधारे नांदेड–लातूर रोडवरील शिवाजीनगर परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेतले असता ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लोखंडी सळई, चाकू, कोयते, मिरची पूड, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ₹1,36,600/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अभिनव कुमार, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी केली. संबंधित पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे मोठा दरोडा टळला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळावली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments