HomeनांदेडGovind Nandede ; इंग्रजीचे आव्हान ;वेळीच उपाय करावा अन्यथा मराठी शाळा बंद...

Govind Nandede ; इंग्रजीचे आव्हान ;वेळीच उपाय करावा अन्यथा मराठी शाळा बंद पडतील. पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे

लोहा। इंग्रजी शाळांचे होणारे अनिर्बंध आक्रमण आणि अतिक्रमण वेळीच सावध होऊन रोकले आवश्यक आहे. जिल्हा परिषद मराठी शाळांनी आपली सर्वोच्च गुणवत्ता सिद्ध नाही केली तर येत्या दहा वर्षात महाराष्ट्रात एक ही मराठी शाळा शिल्लक राहणार नाही अशी भीती राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी व्यक्त केली आहे.

तुळजापुरात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पूर्व शिक्षण संचालक डॉ नांदेडे म्हणाले की मातृभाषा हीच प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे माध्यम आहे शिक्षक नेते लालासाहेब मगर यांनी शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी केलेल्या संघर्षाचे कौतुक केले

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी साखरे यांनी केले. शिक्षक नेते लालासाहेब मगर यांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि उपस्थितांच्या हस्ते माता जगदंबेची विशाल प्रतिमा, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक नेते राज्याध्यक्ष देविदासराव बस्वदे यांनी लालासाहेब मगर यांच्या धाडस, धैर्य आणि साहस या गुण कर्तृत्वाचे कौतुक केले.धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष ,पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे, पुणे येथील विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक डॉ नदाफ, डाएट चे प्राचार्य डॉ दयानंद जेटनुरे , माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंदराव डोंगरे , लोकनेते दयानंद रोचकरी , शिक्षक संघटनेचे जयवंत काळे, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक प् या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले तर आभार अविनाश मोकाशी यांनी मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments