HomeनांदेडParmeshwar Gopatwad elected : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटकपदी हिमायतनगर येथील जेष्ठ...

Parmeshwar Gopatwad elected : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटकपदी हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची निवड

हिमायतनगर| नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, यात हिमायतनगर येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्यावर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल हिमायतनगर येथील मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने गोपतवाड यांचं अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची जंबो कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही कार्यकारणी मराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, विभागीय सचिव शिवशेंद्रे, सचिन अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. प्रदीप नागापूरकर, गोवर्धन बियाणी व जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या सुचणे नुसार करण्यात आली आहे.

gopatwad 2 Parmeshwar Gopatwad elected : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटकपदी हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची निवड

या जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये हिमायतनगर येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची ग्रामीण जिल्हा संघटकपदी नियुक्ती करून त्यांच्यावर जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली आहे. आगामी काळात पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करत पत्रकारावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सडेतोड भूमिका घेणार खंबीर नेतृत्व मिळालं अशी भावना व्यक्त करत हिमायतनग येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, असद मौलाना, अशोक अनगुलवार, त्रिरत्नकुमार भवरे, दत्ता शिराणे, अनिल मादसवार, गोविंद गोडसेलवार, कानबा पोपलवार, सोपान बोंपिलवार, स. अ. मन्नान, पाशा खतीब, गंगाधर वाघमारे, ज्ञानेश्वर पंदलवाड, शुध्दोधन हनवते, साईनाथ धोबे, दिलीप शिंदे, संजय कवडे, अनिल भोरे, संजय मुनेश्वर,

वसंत राठोड, मारोती वाडेकर, पांडुरंग गाडगे, जांबुवंत मिराशे, मनोज पाटील, नागेश शिंदे, गंगाधर पडवळे, धम्मपाल मुनेश्वर, फाहद खान, लक्ष्मण माने, पांडुरंग मिराशे, दाऊ गाडगेवाड, विष्णु जाधव, प्रशांत राऊलवाड, रवि राठोड, अनिल नाईक, धोंडोपंत बनसोडे, राजु गायकवाड, सुभाष दारवंडे, शे मुखीद खडकीकर, फाहद खान, पांडुरंग मिराशे, चांदराव वानखेडे, नागोराव शिंदे, परमेश्वर सुर्यवंशी, शेख खय्युम, सुनील चव्हाण, शंकर बरडे, दत्ता पुपलवाड, शेख अल्ताफ, अनंदा जळपते, सदाशीव पतंगे, मारोती अक्कलवाड, अभिषेक बाक्केवाड, कृष्णा राठोड, ज्ञानेश्वर गोडसेलवार, उत्कर्ष मादसवार, माधव यमजलवाड, अंगद सुरोशे, आदींसह हिमायतनगर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments