देगलूर, गंगाधर मठवाले| नांदेड जिल्ह्यातील मोठे मोठे नेते काँग्रेस सोडून गेल्याने खासदारकिची निवडणूक लढण्यासाठी कोणताही नेता तयार नव्हता. मी सामान्य जनतेच्या भरवशावर निवडणूक मैदानात उतरलो आणि जिंकलो. त्यामुळे नांदेड जिल्हाचा विकास करण्यासाठी जे स्वप्न कै. वसंतराव चव्हाणांनी पाहिल ते स्वप्न मी साकार करणार असल्याचे प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर वासियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाल उत्तर देताना बोलत होते.


पुढे बोलताना ते म्हणाले कि, शेतकऱ्यासाठी संसदेत बोलताना सोयाबीनवर प्रकिया केंद्र उभारल्यास शेतकऱ्याना भाव जास्त येतो आणि तरुणांच्या हाताला देखील काम मिळते. तसेच कासराळी येथे शासकीय जमीन जास्तीतजास्त असल्याने मिरची केंद्र उभारावे यासाठी देखील पाठपुरावा केला. शेतकऱ्याच्या पिक विमासाठी दिल्लीच्या संसद मधे आवाज उठवून शंभर कोटीचा पिक विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी मजूर करावा लागला. काँग्रेस सोबत गरीब कष्टकरी प्रमाणिक शेतकरी असल्याने काँग्रेसला कोणीही सपवू शकत नाही.


आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे. यासाठी प्रयत्न करा असा सल्ला जमलेल्या जनतेला त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष बेटमोगरेकर होते तर व्यासपीठावर देगलूरचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेठवार, देगलूर तालुका काँग्रेसचे प्रतिनिधी बसवराज पाटील वनाळीकर, कैलास येसगे, निवृत्ती कांबळे, शरीफ मामू, प्रितमकुमार कांबळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. मलरेडी यालावार यांनी प्रास्ताविक मध्ये शहापूर परिसरातील रस्ते वीजपुरवठा तलाव शिक्षणासाठी होणारी पालकांना परवड आदी वेगवेगळ्या बाबींवर प्रकाश टाकत खासदार महोदयांचे लक्ष वेधून दिले. यावेळी शहापूर परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




