श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून एका रेती घाटावर अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीचे पत्रकाराला मिळाल्याने दि, २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास ते नदीपात्रात गेले व व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे रेतीतस्करास कोणीतरी माहीती दिली सदरील पित्त खवळलेल्या तस्काराने पत्रकारास भ्रमणध्वनी वरुण अर्वाच्य शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्या ने त्या पत्रकाराने रीतसर तक्रार दाखल केल्याने त्या तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यात अवैध रेती तस्करीने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तोंड वर काढले आहे अवैध रेतीतुन गबर झालेले तस्करांना दुसरा अक्का तयार झाल्याने ते आता मस्तावले आहेत. दि.२४ रोजी शहरा पासून ८ किमी अंतरावरील रेती घाटावर मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध उत्खनन चालू असल्याचे माहीती मिळाल्याने एका वृत्तवाहिनीचे पत्रकार वार्तांकन करण्यासाठी नदी पात्रावर गेले.

येथील अक्का ( रेती तस्कर) यांनी वार्तांकन करणार्या पत्रकाराच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन अरेरावी सह जिवे मारण्याची धमकी दिल्याने पत्रकारांच्या तक्रारीवरून तक्रार दाखल केली सदरील प्रकरणी तालूक्यातील पत्रकार एकत्र आल्याने पोलीसांनी रेती तस्करास पोलीस स्टेशन ला आणून चांगलाच प्रसाद देत पत्रकारांची माफी मागण्यास भाग पाडले असल्याची चर्चा तालूक्यात होत आहे
