हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर टालूक्यातील मौजे जुने आंदेगावयेथील मुस्लिम आणि हिंदू समशान भूमीच्या जागेवर अतिक्रमित (Demand to remove encroachment from Andegaon’s Muslim and Hindu graveyards) झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना अंत्यविधी उरकण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. हि बाब लक्षात घेता तत्काळ हिमायतनगर तालुक्यातील आंदेगावच्या मुस्लिम व हिंदू समशानभूमीतील अतिक्रमित काढून ग्रामपंचायतला ताबा देण्यात यावा. या मागणीसाठी तहसील, पंचायत समिती व भूमिअभिलेख कार्यालयासमोर रामदास देवना पोलसवाड व इत्तर गावकरी मंडळीनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. अतिक्रमण काढण्यात टाळाटाळ केल्यास दरम्यानच्या काळात गावातील मयत होणाऱ्या व्यक्तीचे प्रेत तहसील व भूमिअभिलेख कार्यालयासमोर आणून ठेवण्यात येईल असा इशाराही उपोषणकर्त्याने दिला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव जुने येथील गट क्रमांक 330 मधील 01 हेक्टर 50 आर पैकी मुस्लिम समशानभूमी 30 आर व हिंदू समशानभूमी 01 हेक्टर 20 आर ही जमीन अतिक्रमित झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यापुढे मयताच्या अंत्यसंस्काराची मोठी समस्या निर्माण झाली असून, गावकऱ्यांना नाल्याच्या कडेला किंवा स्वतःच्या शेतात अंत्यविधी करावा लागतो आहे. तसेच 10×10 च्या जागेत प्रेताचा दफनविधी, अंत्यसंस्कार करणे अवघड बनले आहे. दफनविविधी करताना जुन्या प्रेताचे हाडे बाहेर निघत आहेत. कधी कधी तर पूर्ण सापळा देखील निघत आहे. यामुळे मृत्यूनंतरही प्रेताची अवहेलना होण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. हि संवेदनशील बाब असताना सुद्धा प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाही हि खेदाची बाब आहे.


वर्षापासून दोन्ही वहिवाट समशानभूमी वरील अतिक्रमण वाढत गेल्याने तत्कालीन सरपंच सौ. आम्रपाली उत्तम राऊत व सर्व गावकरी मंडळीनी 2022 ला पाठपुरावा केला. त्यावेळच्या जील्हाधिकारी साहेबांनी 4 आदेश काढले. तहसीलदार यांचे 3 आदेश, मंडळ अधिकारी सरसम यांचा अहवाल सादर करून भूमी अभिलेख कार्यालयास फीस भरून तातडीची मोजणी बोलावली होती. पहिल्या मोजणीनंतर देखील सुद्धा दोनदा जमीन मोजून गेली पण कोणत्या राजकीय दबाव पोटी मोजणी करणाऱ्यांनी स्मशानभूमीची जागा दाखवली नाही. एक दोन लोकांच्या दबावा पोटी बोटावर मोजन्य इतक्या लोकांच्या सह्या घेऊन ताबा न देता कुठलीही अतिक्रमणन न हटवता भूमी अभिलेख कार्यालयाने मो.र. क्र.52/2022 निकाली काढले आहे. याचा जाब विचारणाऱ्या तत्कालीन सरपंच सौ. आम्रपाली उत्तम राऊत यांना त्यावेळी मारहाण झाली गावचे प्रकरण ठाण्यात गेले. गावचे लोक पाण्याने भिजत रात्रभर पोलीस ठाण्यात थांबले, मात्र फिर्याद घेण्यास टाळाटाळ झाली. रात्रभर ताटकळत उभे राहिल्यानंतर देखील सात आठ तासाच्या प्रयत्नानंतर पूर्ण गावकऱ्यांना माजी आमदार यांच्या फोनमुळे नाहक त्रास झाला. यामुळे एकमेकांवर गुन्हे नोंद झाली प्रकरण दंडपवले गेले. परंतु हार न मानता कागदपत्रे पाठपुरावा गावकर्यांनी चालू ठेवला आहे.

जमिनीचे मूळ मालक याच्यामते [मुलगा] शंकरराव बापूराव भुसावळे यांनी मोजे आंदेगाव येथे मुस्लिम व हिंदू समाजासाठी 01 हेक्टर 50 आर जमीन समशान भूमीला ई. सन 1992 ला दान दिली होती. मात्र अतिक्रमण झाल्याने त्याचा काय ? फायदा असा प्रश्न समोर आला आहे. जेथे जमीन दान दिलेल्या व्यक्तीच्या नावाचे बोर्ड राहायचे तेथे अतिक्रमण दिसत आहे. म्हणून स्मशानभूमीतील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भूमिअभिलेख विभागातील मोजणी करणाऱ्यां अधिकाऱ्यानी स्वार्थ आणि दबावा पोटी अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ चालवली असल्याचा आरोप निवेदनकर्त्याने केला आहे. आतातरी प्रशासनाने गावकऱ्यांना स्मशान भूमीवर झालेले जुने अंदेगांव येथील हिंदू – मुस्लिम स्मशानभूमी वरील कायमचे अतिक्रमण हटवून ग्राम पंचायत कार्यालयास ताबा देण्यात यावा. दान दिलेल्या जमिनीचा उपयोग सर्व गावातील लोकांना व्हावा. जर अतिक्रमण काढले गेले नाही आणि दरम्यान आंदेगाव जुने येथे कोणाचा मृत्यू झाल्यास त्या मयताच्या मृतदेह हिमायतनगर येथील भूमीअभिलेख व तहसील कार्यालयासमोर आणून ठेऊन जोपर्यंत जागा उपलब्ध करून देण्यात येणार नाही तोपर्यंत ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
