श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शहरात दरवर्षी सट्टतिला एकादशी ला अनेक पायी दिड्या येत असतात अश्याच ऐका दिडिला दि,२५ रोजी रात्रीला विषबाधा झाल्याची घटना घडली असून ५२ भाविकांना भगर खाल्याने विषबाधा झाली असून ४ भाविक गंभीर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सागितले आहे.

तिर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात दरवर्षी षट्टतीला एकादशी निमित्त महाराष्ट्रातील अनेक पायी दिड्या दाखल होतात. मोकळया जागेत, विविध मठात,व शहरातील मंदिर परीसरात तातपुरत्या राहुट्या उभारतात अशीच दि,२४ जानेवारी रोजी जवळा बु ता,सेनगाव जि हिंगोली येथील दिंडी देवदेवेश्वर परीसरात शुक्रवार दि २४ रोजी सायकांळी दाखल झाली.

दि २५ रोजी दिवसभर देवदर्शन करुन एकादशी निमित्त उपवास असल्याने रात्री ८ वा भगर खाल्ली परंतु रात्री २ वाजे पासून अचानक काही भाविकांना मळमळ,उल्या,होऊ लागल्याने त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असे ऐकाऐकाने सकाळ पर्यंत ५२ रूग्ण दाखल झाले. यावेळी माहूर ग्रामीण रुग्णालयातील वैधकिय अधिकारी किरण वाघमारे, तहसीलदार किशोर यादव यांनी तालूक्यातील सर्व आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांना बोलावून उपचार केले,असून भाविक तब्येत चागली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सागण्यात आले.

रूग्णाची विचारपूस व पाहाणी करण्याकरीता माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,सपोनी शिवप्रसाद मुळे, पत्रकार सघटनेचे ता, अध्यक्ष सिर्फराज दोसाणी अदिनी रुग्णास भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान सर्व रूग्णाची प्रकृर्ती स्थीर असूून चिंतेचे कारण नसल्याचे प्रसासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
