हिमायतनगर, अनिल मादसवार| पाणी फिल्टर मशीन, व १५ व्या वित्त आयोगातून लहान मुलांचे अंगणवाडीतील साहित्य, दलित वस्ती मधील कामे, गावातील अंतर्गत नाल्या व इतर गावातील विकास कामाचे कोणतेही अंदाज पत्रक न करता परस्पर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक खिल्लारे यांनी संबंधित अभियंता यांना हाताशी धरून कागदोपत्री कामे झाल्याचे दर्शवून शासनाचा निधी उचलून घेऊन हडप केल्या प्रकरनाच्या चौकशीसाठी (Corruption in various development works in Ekamba) होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन गेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून, जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी व सरपंचावर कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्र गावकऱ्यांनी घेतला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा ग्राम पंचायतीत झालेल्या गैर व्यवहाराची चौकशी करून प्रामसेवक खिल्लारे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी एकंबा येथील गावकर्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची भेट घेऊन केली होती. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने संयुक्त चौकशी समिती नेमण्यात आली व सदर प्रकरणाची तात्काळ चौकशो करून विना विलंब चौकशी अहवाल या कार्यालयास सादर करण्याचे गटविकास अधिकारी यांनी संबंधित पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व ग्रामसेवकाला केले होते. परंतु चौकशी अहवाल सादर न केल्यामुळे हिमायतनगर येथील आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या जनता दरबारात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.


त्यावरून गटविकास अधिकारी यांनी तात्काळ चौकशी अहवाल सादर करणे बाबत स्मरणपत्राद्वारे संबंधितांस कळविले होते. परंतु उपोषणाची डेडलाईन जवळ आली असताना चौकशी अहवाल सादर केला नसल्याने एकंबा येथील नागरिक यशवंत मारोती वाघमारे व इंतर गावकऱ्यांनी ग्रामसेवक, सरपंच, यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असलेल्या शंकेवरून कोणतीही चौकशी न केल्यामुळे दिनांक २३ जानेवारी २०२५ पर्यंत कारवाही करून त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केल्यास दिनांक २४ जानेवारी २०२५ पासून पंचायत समिती हिमायतनगर समोर उपोषणास करणार असल्याचे कळविले होते.

मात्र चौकशी अहवाल सादर न झाला नाही, त्यामुळे एकंबा गावातील पाणी फिल्टर मशीन, व १५ व्या वित्त आयोगातून लहान मुलांचे अंगणवाडीतील साहित्य, दलित वस्ती मधील कामे, गावातील अंतर्गत नाल्या व इतर गावातील विकास कामाचे कोणतेही अंदाज पत्रक न करता परस्पर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक खिल्लारे यांनी संबंधित अभियंता यांना हाताशी धरून कागदोपत्री कामे केल्याचे दाखवून शासनाचा निधी उचलून घेऊन हडप केला आहे. या प्रकरनाच्या चौकशीत होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन गेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत गावाच्या विकासासाठी उपलब्ध झालेल्या निधीचा अपहार करणाऱ्यावर कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा पवित्र एकंबा येथील गावकर्यांनी घेतला आहे.
