नांदेड| भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वा. झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन (Flag hoisting by Collector Abhijit Raut at the Collector’s office) करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस मैदानावरील मुख्य समारंभापूर्वी हे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कार्यालयातील सर्व विभागाचे धिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन
भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्यण कार्यालयात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सकाळी 7.40 वा. ध्वजारोहण करण्यात आले.


या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील, जिल्हा जात पडताळणी समिती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे व विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, बार्टीचे प्रकल्प अधिकारी व बाह्यस्त्रोत मनुष्यबळ, समतादूत व तालुका समन्वयक असे एकूण 115 अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमीत्त भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने संविधान प्रस्ताविकेचे सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात सामुहिक वाचन करण्यात आले. घरघर संविधान निमित्त संविधान प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले. राज्यगीत घेवून सामूहिक तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. सदर प्रजासत्ताक ध्वजारोहण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
