Flag hoisting : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते झेंडावंदन
नांदेड| भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वा. झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन (Flag hoisting by Collector Abhijit Raut at the Collector's office) करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस मैदानावरील मुख्य समारंभापूर्वी हे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कार्यालयातील सर्व विभागाचे धिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन
भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्यण कार्यालयात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सकाळी 7.40 वा. ध्वजारोहण करण्यात आले.
...
