
नांदेड| शहरात एक धक्कादायक प्रकार घडला रेल्वे स्टेशन परिसरात, दोन युवकांनी एका मुलीला भर दिवसा उचलून नेते आणि जबरदस्तीने अपहरण केले. हा प्रकारचं सिसिटीव्ही आणि सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाला आहे .



व्हिडिओमध्ये मुलीला जबरदस्तीने पकडून दुचाकीवर उचलण्यात नेताना दिसते आहे, ती जोरदार प्रतिकार करत आहे पण अपहरण करणारे लोक थांबत नाहीत . या घटनेचे साक्षीदार अनेक होते, परंतु फक्त एक व्यक्ती व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे; अन्य नागरिकांनी काहीच हस्तक्षेप केलेले नाही.


घडामोड लक्षात येताच नांदेड पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब आरोपींचा पाठलाग सुरू केला आणि किशोरीला सुरक्षितरीत्या वाचवले अशी माहिती एसपी अबिनाश कुमार यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की; त्या वेळी पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते आणि ते लगेच मागोवा घेतल्याने, आरोपींनी मुलीला रस्त्यावरच फेकून पळन जाण्यास भाग पाडले आणि ते फरार झाले असून, पोलिसांनी या प्रकाराला गंगाभीर्याने लक्षात घेऊन व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून दोन्ही आरोपीना रात्री ११ वाजता अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. एस. पी. नायक यांनी आपल्या सहकार्यांसह हि कार्यवाही केली.





