नांदेडमहाराष्ट्र

Farmars morcha ; शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला -NNL

नांदेड/नायगाव,अनिल मादसवार। नायगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आसूड मोर्चा काढला, या मोर्चात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधल्यामुळे तहसीलचे अधिकारी कर्मचारी नागरीक काही काळापुरते आत अडकून पडले होते.

ई पीक पाहनी नोंदणी रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात यावी. 2023 चा पिक विमा सरसकट देण्यात यावा. तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात. सिबिलची अट रद्द करण्यात यावी. 7/12 ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी.

IMG 20240822 170629 Farmars morcha ; शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला -NNL

अशा विविध मागण्या घेऊन नायगावच्या हेडगेवार चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत ०५ किलोमीटर चालत शेतकरी- महिला मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होते. तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर बराच वेळ होऊनही अधिकारी दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला आहे. मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या गेटवरच सभेमध्ये रूपांतर झाले आणि यावेळी शेतकरी पुत्रांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या.

IMG 20240822 170619 1 Farmars morcha ; शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला -NNL

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, किसान ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉ दत्ता मोरे देगांवकर ,शेतकरीपुत्र श्याम पाटील वडजे, युवा नेते गजानन चव्हाण,छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे,प्रवीण बैस, बळवंत शिंदे या शेतकरी पुत्रांनी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सरकार दरबारी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि खरपूस समाचार घेत मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकू असा सज्जड ईशारा सुद्धा देण्यात आला.यावेळी शिवराज पाटील होटाळकर, साहेबराव चट्टे, रणजित देशमुख, हनुमंत शिंदे, राहुल गायकवाड,देवीदास वडजे, गजानन कदम, कैलास वाकरडे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!