HomeनांदेडHeavy Rain Strong Winds Lightning ; हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे,...

Heavy Rain Strong Winds Lightning ; हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट झाला जोरदार अवकाळी पाऊस

हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर शहर व तालुका परिसरात मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन जोरदार अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. तर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना काहींसा दिलासा मिळाला होता.
गेल्या आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्याचा हिमायतनगर तालुका परिसरात उष्णतेने उच्चांक काढला असून, उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 4 . 30 च्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांची एकचं धावपळ उडाली होती, तर शेतीत वादळामुळे हळदीसह वैरनाचं मोठं नुकसान झालं आहे. आजच्या वादळी पावसाने उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.
IMG 20250408 185831 Heavy Rain Strong Winds Lightning ; हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट झाला जोरदार अवकाळी पाऊस
तर आंब्याच्या झाडाला लगडलेली आंबे, टरबूज, चिकूसह ईतर फळबागांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतात साठवून ठेवलेलं इंधन परहट्या व वैरण उडून गेली, तर शेतीत असलेल्या हळद, तीळ, भुईमूग, सूर्यफूल,उन्हाळी ज्वारी, आदी पिकांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर काही ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली असून, ग्रामीण भागातील काही गावातील नागरिकांच्या घरांसह झोपड्या वरील टिनपत्रे उडून गेल्याने संसारउपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे.एकूणच वादळी वारे पावसामुळे ग्रामीण भागातील व हिमायतनगर शहरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
एकूणच आज झालेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाटात अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना हैराण करून सोडले होते यामुळे शेतकरी नागरिकांची एकच धावपळ उडाली असल्याचे पहावयास मिळाले आहे.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments