Heavy Rain Strong Winds Lightning ; हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट झाला जोरदार अवकाळी पाऊस
हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर शहर व तालुका परिसरात मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन जोरदार अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. तर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना काहींसा दिलासा मिळाला होता.
गेल्या आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्याचा हिमायतनगर तालुका परिसरात उष्णतेने उच्चांक काढला असून, उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 4 . 30 च्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांची एकचं धावपळ उडाली होती, तर शेतीत वादळामुळे हळदीसह वैरनाचं मोठं नुकसान झालं आहे. आजच्या वादळी पावसाने उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकां...
