नांदेडमहाराष्ट्र

Dr. Manohar Chaskar ; गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणिव करून देण्याची गरज – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

नांदेड | पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडयातील नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास माहित नाही. मराठवाडयाच्या स्वातंत्र्यासाठी रजाकाराची गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणीव करून देण्याची गरज आहे. मराठवाडा मुक्ति संग्राम जागर उपक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. असे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु मा.डॉ. मनोहर चासकर यांनी केले. ते राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्व. बसवंतराव मुंडकर विचार मंच नांदेड यांच्या वतीने आयोजित “पत्रकार पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून बोलत होते. यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते.

IMG 20241004 205639 Dr. Manohar Chaskar ; गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणिव करून देण्याची गरज - कुलगुरू डॉ. मनोहर चासकर - NNL
पीपल्स कॉलेज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात ४ ऑक्टोंबर रोजी कुलगुरू मनोहर चासकर डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते मराहवद मुक्ती संग्रामातील स्व.बसंतराव मुंडकर यांच्यावर आधारित चळवळीतील उपेक्षित बाप माणूस” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. छायाचिर – प्रमोदसिंह ठाकूर, नांदेड

डॉ. मनोहर चासकर पुढे असेही म्हणाले की, मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात अनेक योध्ये लढले, त्यांचा सहास त्यातील सर्वांचाच इतिहास मांडण्यात आला नाही, याबाबत महाविद्यालयानी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या साहाय्याने माहिती संकलीत करावी. त्यांचा समग्र ग्रंथ खामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रकाशित करेल. याविषयीचे पत्र आजच निर्गमीत करायात येईल. आठ दिवसात महाविद्यालयाला पत्र पोहचेल. उपेक्षित किंवा माहिती नसलेल्या हुतात्म्यांच्या विषयीची मांडणी नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल.

IMG 20241004 WA0070 Dr. Manohar Chaskar ; गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणिव करून देण्याची गरज - कुलगुरू डॉ. मनोहर चासकर - NNL
पीपल्स कॉलेज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात ४ ऑक्टोंबर रोजी कुलगुरू मनोहर चासकर डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार संजीवजी कुलकर्णी सर यांना माध्यम क्षेत्रातील ग्रामीण भागातून पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. छायाचिर – प्रमोदसिंह ठाकूर, नांदेड

यावेळी डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी धर्माबाद रेल्वे स्थानकास मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे, अशी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत मागणी केल्याचे व तसा पत्रव्यवहार पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री तसेच रेल्वे प्रशासनाला केल्याचे जाहिर केले. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त प्रतिनिधीचे मनोगत जेष्ठ पत्रकार संजिव कुलकर्णी यांनी केले. स्वातंत्र्य चळवळीतील सन्मानित कुटुंबियांचे प्रतिनिधींचे मत जेष्ठ नागरिक तात्यासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोष करतांना राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी पूर्वीची पत्रकारिता, आताच्या पत्रकारितेपुढील आव्हाणे याबाबत सविस्तर मांडणी केली. पुरस्कार प्राप्त पुरस्कार पत्रकारांविषयी कौतुक करतांनाच विधायक पत्रकारितेची गरज प्रगट केली.

IMG 20241004 WA0071 Dr. Manohar Chaskar ; गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणिव करून देण्याची गरज - कुलगुरू डॉ. मनोहर चासकर - NNL
पीपल्स कॉलेज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात ४ ऑक्टोंबर रोजी कुलगुरू मनोहर चासकर डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिलजी मादसवार यांना माध्यम क्षेत्रातील ग्रामीण भागातून पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. छायाचिर – प्रमोदसिंह ठाकूर, नांदेड

श्री कुलथे पुढे असेही म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामातील उपेक्षित आणि अज्ञात चळवळी योध्‌यांची माहिती संकलीत व प्रसारीत होण्याची गरज आहे. १७ सप्टेंबर२०२४ ते ०२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्य मराठी पत्रकार परिषदेने आणि स्व.बसवंतराव मुंडकर विचार मंचाने राबविलेल्या विविध उपक्रमाचे दूरगामी चांगले परिणाम होतील. प्रातिनिधीक दोन चांगल्या पत्रकारांचा सन्मान केल्यामुळे नवीन चांगली व जबाबदार पत्रकारांची पिढी तयार होईल. संपूर्ण राज्यातील पत्रकारांच्या आरोग्यासाठी व्यापक कार्यक्रम राज्य मराठी पत्रकार परिषद आयोजित करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. प्रारंभी दिप प्रज्वलन करुन आणि स्वामी रामानंद तीर्थ व स्व. बसवंतराव मुंडकर यांच्याप्रतिमेला पुष्प अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील लढवय्य यांच्या कुटुंबातील तात्या देशमुख, विनोद गंगाप्रसादजी अग्रवाल आणि श्रीमती भागीरथबाई मुंडकर यांचा तर पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार संजिव कुलकर्णी व ग्रामीण पत्रकार अनिल मादसवार यांचा सत्कार करण्यात आला.

कुलगुरू आणि मान्यवरांच्या हस्ते चळवळीतील उपेक्षित बाप माणूस” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाच्या संपादिका ललित बंडे यासह प्रकाशक, मुद्रक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद मुंडकर तर नेटके संचालन डॉ. शिवदास हमंद यांनी केले. या कार्यमाच्या सफलतेसाठी राजकुमार बिराला, अनिल सिरसाट, साहेबराव जाधव, आदिनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!