Savitrimai Phule ; सम्राट राजे मल्हारराव व मान्यवर कांशीरामजी यांची जयंती तसेच राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले स्मृती दिन साजरा

नांदेड l पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे १६ मार्च रोजी सम्राट राजे मल्हारराव होळकर व मान्यवर कांशीरामजी तसेच राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांची जयंती निमित्त,वाचक मेळावा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.


अध्यक्षीय भाषणात म्हणाले, वाचन संस्कृती वाढली तरच येणार्या पिढीला खरा इतिहास माहित होईल आणि इतिहास घडवतील,ज्या काळात शिक्षण घेण्याचा व राजा बनण्याचा अधिकार होता त्या काळात एका मेढपाळाचा मुलगा मल्हारराव होळकर सम्राट बनतो. आता तर महापुरूषांच्या संघर्षातून तयार झालेल्या संविधाना मुळे सर्व क्षेत्रातील अधिकार मिळाले म्हणून मला जिल्हाध्यक्ष होण्याचा मान मिळाला, येणारी पिढी व आपण इतिहास विसरत चाललो म्हणून घसरत आहोत की काय असे वाटू लागले आहे.

त्यामुळे मनुस्मृती चे बळी होतोय की काय याची भीती वाटत आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक तुकाराम टोपें म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा चालवून जेथे मनुस्मृती निर्माण झाली त्या उतर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एका दलित महिला मायावतीला करून दाखविले त्या मान्यवर कांशीरामजी यांच्या विचारांचे कार्य पुढे त्याग मुर्ती मायावती व महादेव जानकर घेवून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांना आपण साथ दिली पाहिजे, तरच आपण संविधान वाचवू शकतो असे सांगितले.


प्रमुख पाहुणे डॉ स्वामी म्हणाले, आजची पिढी शिक्षणा पासुन दूर जात असून मोबाईलच्या आहारी जात आहे. वाचन संस्कृती जोपासून चालणार नाही तर त्याला कृतीची जोड लागते. आपण आपल्या जीवनात एका रूपयात बारा आणे अंधश्रद्धेवर खर्च करतो आणि चार आण्यात प्रपंच चालवतो म्हणून आपण दारिद्रयातून बाहेर पडत नाही.

लग्न, नवस, भंडारे, आणि देव भोळेपणातल्या अंधश्रध्देवर होणार खर्च मुलांच्या शिक्षण, संस्कारावर आणि समाज रूण परत फेड करण्यासाठी वापरलो तर जीवनात दारिद्र कधिच येणार नाही असे जीवनमान सुधारण्यावर मार्गदर्शन केले. यानंतर गोविंदराम शुरनर, बापुराव वाकोडे, आश्रुबा कोळेकर यांची भाषणे झाली.
या वेळी डॉ.गणपतराव जिरोनेकर, डॉ.संतोषकुमार नाईक. प्रा.चंद्रकांत रोडे, शिवकांत मैलारे , भिमराव शेळके, आंनदराव राजुरे, साहेबराव गोरटकर, नागनाथ कोकणे, हानंमंतराव वनाळे , गणपतराव शुरनर, नारायण पतंगे, आरजे तुडमे, आकाश कोकणे, बंटी काळे,ज्योती कसनकर, वनिता राठोड, सावित्रा शूरनर ,नरसा धुळगंडे, सविता हेळगिरे व अनेक वाचक वर्ग यांचीउपस्थिती होती. ग्रंथपाल मदनेश्वरी देवकते यांनी सर्वांचे आभार मानले.



