Sp abinash kumar : गणेशोत्सव अनुषंगाने नांदेड पोलीस सज्ज – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार

नांदेड| गणेशोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांत शांतता कमिटीच्या बैठका घेऊन गणेश मंडळे व नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरासह ग्रामीण भागात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्थानिक बंदोबस्तात 2 अपर पोलीस अधिक्षक, 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 39 पोलीस निरीक्षक, 206 उपनिरीक्षक, 3195 अंमलदार, 5 आरसीपी प्लाटून, 1 एसआरपीएफ कंपनी, 48 क्युआरटी अंमलदार तसेच 1300 पुरुष व 275 महिला होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे.

याशिवाय बाहेरूनही अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला असून त्यात 2 पोलीस उपअधीक्षक, 6 पोलीस निरीक्षक, 1 एसआरपीएफ कंपनी, 50 महामार्ग पोलीस अंमलदार व 20 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

गणेशोत्सव सुरळीत पार पडावा म्हणून रूट मार्च, दंगा काबू सराव तसेच संयुक्त सुरक्षा मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना भयमुक्त व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button