धार्मिकनांदेड

Mahashivratri Darshan : नागडोह देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी, आमदार भीमराव केराम यांनी घेतलं दर्शन

इस्लापूर/किनवट | महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यातील श्री क्षेत्र नागडोह देवस्थानात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान महादेवाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान आमदार भीमराव केराम यांनी उपस्थित होऊन महादेवाचे दर्शन घेऊन शेतकरी, मायबाप जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान परिसरात सुव्यवस्थित दर्शन व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!